Thursday, April 25, 2024
Homeनगरदिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन हे राजकीय नाट्य

दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन हे राजकीय नाट्य

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन हे व्यापारी पुरस्कृत आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकर्‍यांचे नुकसान करणारे आहे.

- Advertisement -

नव्या कृषी कायद्यामुळे शेतमाल कुठेही विकता येतो. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन हे केवळ राजकीय नाट्य असून त्यामध्ये शेतकरी हिताचा विचार नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.

राज्य व देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी दि.28 नोव्हेंबरपासून रघुनाथदादा पाटील यांनी सुरू केलेली जन प्रबोधन यात्रा काल राहुरी तालुक्यात आली होती. पाटील म्हणाले, सरकार, कारखानदार, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी एकमेकांशी साटेलोटे करून शेतकर्‍यांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.

ऊस उतार्‍यात दोन टक्के आणि उतारा काढण्याच्या पद्धतीमध्ये एक टक्का चोरी करून शेतकर्‍यांचे टनामागे 855 रुपयांचे नुकसान आहे. तोडणी वाहतुकीमध्ये चारशे रुपयाची लूट सध्या चालू आहे. तसेच कारखान्यात तयार होणार्‍या उपपदार्थांचा हिशोब केल्यास चार हजार रुपयाहून अधिक दर मिळू शकतो. मात्र, राजू शेट्टी, सदा खोत या नेत्यांनी 2850 च्यावर एफआरपी न मागण्याचे पाप केले आहे. शेतीमालावर उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळायला हवा.

आज होणार्‍या शेतकरी विरोधी संपात कोणीही सहभागी होऊ नये. शेतकर्‍यांची कत्तलखाने ठरलेल्या बाजार समित्या व आवश्यक वस्तू कायदा तसाच रहावा, असे म्हणणार्‍यांचा हा बंद आहे. कंत्राटी शेती अदानी-अंबानी नव्हे तर सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी उपयोगी आहे. अदानी-अंबानी करार शेती करतील, असे नाही.

तर सर्वसाधारण शेतकरीसुद्धा पाच पन्नास एकर जमीन करू शकतील. काही सुधारणा केल्या तर हे कायदे शेतकर्‍यांच्या उपयोगाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. जनप्रबोधनयात्रा अहमदनगरहून कोपरगाव येथे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून यात्रा पुढे निघाली.

यावेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष अमोल मोढे, संजय मोकाटे, शिवाजी मोकाटे, जनार्धन शेटे, विशाल मोढे, श्रीकांत मोढे, सतीश देठे, राम मोरे आदी शेतकरी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या