Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविभागीय आयुक्त पदी गमेंची नियुक्ती

विभागीय आयुक्त पदी गमेंची नियुक्ती

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. विभागीय आयुक्त राजाराम माने वयोमानाने आज (दि.३१) सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पदोन्नतीने गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत वीस महिने आयुक्त म्हणुन चांगली कामगिरी केल्यानंतर मागिल आठवड्यात राधाकृष्ण गमे यांची अचानक शासनाने बदली केली होती. ही बदली केल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही पद देण्यात आलेले नव्हते.

मात्र ते पदोन्नतीवर असल्याने काही महिने त्यांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच गमे यांची नाशिक विभागीय आयुक्त माने यांच्या जागी नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले जात होते.

मात्र आज नाशिक विभागीय आयुक्त माने हे वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्य शासनाच्याकडुन त्यांच्या जागी गमे यांची नियुक्ती करण्यात आली.

आज सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या नियुक्तीचे आदेश काढत गमे यांना तत्काळ स्विकारावा असेही आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या