Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाभारतीय खेळाडूंवर पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी

भारतीय खेळाडूंवर पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी

सिडनी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंना पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सामना काही काळ थांबबा लागला. अखेरी पोलिसांना पाचारन करण्यात आले. त्यानंतर सहा प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -

सिडनी कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिप्पणी होत असल्याची तक्रार केली. याआधी तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याची तक्रार भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती.मॅचच्या चौथ्या दिवशीही मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली. सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याची तक्रार सिराजने केली आहे.

खेळ थांबवला

वर्णद्वेषी टिप्पणीची तक्रार केल्यानंतर काही मिनिटे खेळ थांबला.पोलिसांनी त्या सहा प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जायला सांगितले, यानंतर खेळाला सुरूवात झाली.

दरम्यान शनिवारी बुमराह आणि सिराजवर करण्यात आलेल्या या टिप्पणीवर बीसीसीआयनेही नाराजी जाहीर केली आहे. अशाप्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले आहेत. ‘

CA कडून दिलगीरी

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने टीम इंडियाची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, वर्णद्वेषी टिप्पणीसंदर्भात आमची जीरो टॉलरेंस पॉलिसी आहे. या घटना आम्ही होऊ देणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या