Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत बिर्ला कुटुंबियांसोबत वंशभेद; हॉटेलमधून काढले बाहेर

अमेरिकेत बिर्ला कुटुंबियांसोबत वंशभेद; हॉटेलमधून काढले बाहेर

दिल्ली | Delhi

देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबियांसोबत वंशभेद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिर्ला कुटुंबियांसोबत ही घटना अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला यांनी ट्वीट करून याची माहिती दिली.

- Advertisement -

अनन्या बिर्लाने ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “या रेस्टॉरट स्कोपा इटालियन रूट्सने मला आणि माझ्या कुटुंबियांना आपल्या परिसरातून बाहेर काढले. हा वंशभेद खरच दु:खी करणारा आहे. तुमच्या तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हे योग्य नाही.” तसेच “आम्ही रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी तीन तास वाट पाहिली. शेफ अँटोनियो तुमचे वेटर जोशुआ सिल्वरमॅन यांची माझ्या आईसोबत वागणूक खूपच कठोर होती. याला वंशभेद म्हटले जाऊ शकते. हे योग्य नव्हे.”

कुमार मंगलम बिर्ला यांची पत्नी आणि अनन्या बिर्लाची आई नीरजा बिर्लानेही ट्वीट करत ही घटना खूपच हैराणजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की रेस्टॉरंटला कोणत्याही ग्राहकाला अशी वागणूक देण्याचा कोणताही अधिकार नाही.

नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्लानेही या प्रकरणी ट्वीट करत अत्यंत खराब अनुभव असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या