Thursday, April 25, 2024
Homeनगर2 लाख 28 हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

2 लाख 28 हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात पावसाळा लांबल्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 28 हजार हेक्टरवर पेरणी झाली

- Advertisement -

असून यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाचे 1 लाख 82 हजार हेक्टर आहे. झालेल्या एकूण पेरणीची टक्केवारी 32 टक्के असून यावरून यंदा ज्वारीचे नियोजित क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक असून त्याचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 77 हजार आहे. यासह गहू आणि हरभरा पीक देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून थंडी गायब झाल्याने गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात आतपर्यंत 8 हजार 640 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून 31 हजार 662 क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे.

जिल्ह्यात ऊस पिकाची लागवडीचे क्षेत्र 41 हजार हेक्टरच्या पुढे गेले असून चारा पिकांचे क्षेत्र देखील 22 हजारांच्या जवळपास झाले आहे. कांदा पिकाची लागवड देखील विक्रमी झाली असून सध्या 55 हजार 313 कांदा पिक आहे.

अशी आहे पीकनिहाय पेरणी

ज्वारी 1 लाख 82 हजार हेक्टर, गहू 8 हजार 640 हेक्टर, मका 5 हजार 47 हेक्टर, हरभरा 31 हजार 662 हेक्टर, करडई 61, तीळ 31, जवस 28, सुर्यफुल 10, फळपिके 2 हजार 944, फूलपिके 359, मसाला पिके 58 आणि भाजीपाला पिके 5 हजार 947 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या