Thursday, April 25, 2024
Homeनगररब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

रब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा दमदार पावसामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 6 लाख 41 हजार हेक्टवर प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारी पिकाचे नियोजन असून ज्वारीचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर तर हरभरा पिकाचे क्षेत्र 1 लाख 30 हजार हेक्टर नियोजित आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती दयनीय झाली असून आता पाऊस न थांबल्यास खरीप हंगामातील पिके उफाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात खरीप हंगामात देखील दमदार पावसामुळे शतप्रतिशत पेरण्या झाल्या होता. मात्र, जून ते सप्टेंबर या कालावधीत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून याचा पिकांवर परिणाम होतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर जादाच्या पावसामुळे पिकांची केवळ वाढ झाली असून त्यांना शेंगांची लागण कमी असल्याचे दिसत आहे. त्यात आता कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. वास्तवात नगर जिल्हा हा राज्याच्या कृषीच्या नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात परतीच्या पावसावर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची मदार असते. काही वर्षापासून जिल्ह्यातील पावसाचा चित्र बदलत आहे.

जूनपासून दमदार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामाची पिके जोमात असल्याचे दिसतात. मात्र, जादाच्या पावसाने या पिकांचे मातेरे होत असल्याचे शेतकरी आता अनुभवत आहेत. दरम्यान, कृषी विभागाने आता रब्बी हंगामाचे नियोजन सुरू केले असून यात 6 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्र हंगामासाठी प्रस्तावित केले आहे. यात रब्बी ज्वारीचे 3 लाख 49 हजार, गहू 99 हजार 999, मका 3 हजार 500, हरभरा 1 लाख 30 हजार, सुर्यफूल 700, ऊस लागवड 57 हजार 33 हेक्टरचा यांचा समावेश आहे. यासह 1 लाख 62 हजार 875 क्षेत्रावर भाजीपाला, 12 हजार 189 क्षेत्रावर फळपिके, 457 क्षेत्रावर फुल शेती यासह 1 लाख 75 हजार 521 हेक्टवर अन्य पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे रब्बी हंगामासह अन्य शेतपिकांसह कृषी विभागाने 8 लाख 16 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन केले आहे.

तालुकानिहाय प्रस्ताविक क्षेत्र (हेक्टरमध्ये)

नगर 94 हजार 683, अकोले 15 हजार 853, जामखेड 67 हजार 555, कर्जत 1 लाख 2 हजार 504, कोपरगाव 40 हजार 224, नेवासा 41 हजार 66, पारनेर 1 लाख 8 हजार 190, पाथर्डी 56 हजार 621, राहाता 35 हजार 203, राहुरी 42 हजार 238, संगमनेर 46 हजार 786, शेवगाव 48 हजार 501, श्रीगोंदा 84 हजार 371, श्रीरामपूर 33 हजार 38 असे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या