Tuesday, April 23, 2024
Homeनगररब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी शुक्रवारी आढळाची बैठक

रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी शुक्रवारी आढळाची बैठक

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 16 गावांच्या लाभक्षेत्रातील 3914 हेक्टर क्षेत्राच्या रब्बी हंगाम आणि उन्हाळी आवर्तनासाठी

- Advertisement -

कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती जलसंपदाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी.पी.हारदे यांनी दिली.

शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर यांचे उपस्थितीत सन 2020-21 साठी कालवा सल्लागार समितीसह ही पाणीनियोजनाची बैठक पार पडेल.

1060 दलघफू.पाणीक्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पात सध्याचा पाणीसाठा 977 दलघफू आहे.मागील वर्षी पहिले आवर्तन 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी2020 या कालावधीत पार पडले होते. यावर्षी लाभक्षेत्राचा भुजलसाठा अद्यापही समाधानकारक असल्याने लाभधारकांची पाणीमागणी होत नव्हती.

आता बैठकीतील नियोजनानंतर पाणीमागणी सुरु होण्याची शक्यता असून पाणीनियोजनासाठी लाभधारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जलसंपदाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी.पी.हारदे आणि अभियंता अभिषेक पवार यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या