Friday, April 26, 2024
Homeनगरएसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाने वेगळी दिशा घेतली तर त्यास आघाडी सरकार जबाबदार -...

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाने वेगळी दिशा घेतली तर त्यास आघाडी सरकार जबाबदार – दरेकर

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न (Question of ST Employees) सोडविण्याऐवजी कर्मचार्‍यांचे निलंबन करणे त्यांना त्रास देणे असे काम राज्यातील आघाडी सरकार (Aghadi Government) करत आहे. धाक दाखवून एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन (ST workers Movement) चिरडता येणार नाही. कर्मचार्‍यांच्या आंदोलने वेगळी दिशा घेतली तर त्यास आघाडी सरकार जबाबदार असेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar) यांनी दिला.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते दरेकर (Pravin Darekar) हे काल संगमनेर (Sangamner) येथे आले होते त्यांनी बस स्थानक (Bus Stand) परिसरात जाऊन एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका (Criticism of the State Government) केली. एसटी हा आपल्या आस्थेचा विषय आहे. आपले वडीलही एसटी कर्मचारी होते. आपण प्रथम पासूनच एसटी कर्मचार्‍यांसोबत आहोत. राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी दोन पावले मागे येऊन त्यांच्या मागण्या बाबत निर्णय घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकर्‍यांसाठी दोन पावले मागे येऊन शेतकरी कायदे रद्द केले. ही खरी लोकशाही आहे.

आगामी अधिवेशनात आम्ही एसटी कर्मचार्‍यांचा विषय घेणार आहोत. एसटी कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढू असे आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले. 54 कर्मचार्‍यांचे बळी जाऊनही आघाडी सरकारला जाग येत नाही. हे सरकार दगडाच्या काळजाचे सरकार आहे. राजकारणासाठी मंत्र्यांना वेळ आहे मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. या सरकारला एसटी कर्मचार्‍यांच्या लढ्या समोर झुकावेच लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या