आधी पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंनी लस टोचावी, त्यानंतरच मी टोचून घेईन – प्रकाश आंबेडकर

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद | Aurangabad

करोनाच्या लढ्यात देश आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आज देशभरात करोना लसीकरणाचा शुभांरभ झाला. करोना लसीकरण अभियानास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली. मोदींच्या हस्ते देशव्यापी लसीकरण मोहिमेची

सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात लसीकरण अभियानाचा शुभारंभ झाला. मात्र या लसीकरण मोहिमेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लसीकरण मोहिमेबद्दल सवाल विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद शहरात आज पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ‘केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दरम्यान, करोना लसीकरणाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका आणि प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण 3 कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *