महाराणी एलिझाबेथ यांचे निधन, ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth second) यांचे निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल ७० वर्षे राज्य केल्यानंतर, ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ महाराणी राहिलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी बालमोरल येथे निधन झाले.

बर्लिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या वर्षापासून एपिसोडिक मोबिलिटीच्या समस्येने त्रस्त होत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राज्य केले आहे.

२१ एप्रिल १९२६ झाली लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म झाला. २० नोव्हेंबर १९४७ रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. १९४५ साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या.

१४ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. २ जून १९५३ रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला.

२१ जून १९८२ रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी ६० वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर २०१५ साली ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या.

ब्रिटनची महाराणी म्हणून त्यांनी तीन वेळेस आपले पती प्रिन्स फिलीप यांच्यासोबत भारत दौरा केला होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप हे तीन वेळेस भारत दौऱ्यावर आले होते. त्यांचा भारत दौरा हा १९६१, १९८३ आणि १९९७ साली झाला होता. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले होते.