Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - वृश्चिक Quarterly Future - Scorpio

त्रैमासिक भविष्य – वृश्चिक Quarterly Future – Scorpio

सौ. वंदना अनिल दिवाणे

जुलै – 2021

- Advertisement -

ग्रहस्थिती-आठवड्याच्या सुरवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात शनी-प्लूटो, चतुर्थात नेप गुरु जेष्ठात हर्शल, सप्तमात राहू-बुध अष्टमात रवी, नवमात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास- तुमच्या राशीची आद्याक्षरे, तो, ना, नी, ने, ने, नो, या,यी, यू अशी आहेत. तुमच्या वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी-मंगळ, उत्तर दिशा तुमच्यासाठी फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्यल वर्ण-ब्राम्हण, कफ- प्रकृती. पाठ किंवा गुदासंबंधी विकाराची काळजी घ्यावी. शुभ रत्न-पोवेळ, शुभ रंग- लाल, शुभ वार-मंगळवार, देवता-शिव, हनुमान व भैरव. शुभ अंक 3, शुभ तारखा 9, 18, 27 मित्र राशी-कर्क व मीन, शत्रू राशी-मेष, सिंह, धनू. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच वार करील. मात्र प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राणपणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधे व डॉक्टर्ससाठी चांगली रास. दृढ, साहसी, कर्मठ, स्पष्टवादी स्वभाव.

अष्टस्थानी असलेल्या रविमुुळे नवविवाहितांना लाभ होईल. किंबहुना अशा लोकांना विवाहानंतर भाग्योदय सुुरु झाल्याची प्रचिती येईल. नववधूवर असलेल्या प्रेमामुळे म्हणा किंवा अन्यकाही कारणामुळे घरातील इतर मंडळीशी पटणार नाही. लहान लहान गोष्टीवरुन कलह निर्माण होईल. ‘सास भी कभी बहू थी’ या सारखी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल.

स्त्रियांसाठी- भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहिल. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही.कडे तूूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहिल.

शुभ तारखा- 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28,29

ऑगस्ट – 2021

ग्रहस्थिती- महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात शनी-प्लूटो, चतुर्थात गुरु नेपच्यून, जेष्ठात हर्शल, सप्तमात राहू, नवमात रवी-बुध, दशमात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

दशमात मंगळ आहे. इतरांना उत्तम सल्ला देऊ शकाल. स्वतःचा व त्यांच्या फायदाही होईल. मात्र स्वतःच्या बाबतीत निर्णय घेणे काहीसे कठीण जाईल. आर्थिक स्थिती जेमतेम राहिली तरी खर्चाला पैसा कमी पडणार नाही. स्त्री वर्गाबद्दल विशेष आपुलकी वाटेल. जवळीक मात्र टाळावी.

नवमात बुध आहे. स्त्री-पुत्र सुख उत्तम मिळेल. आर्थिक आवक चांगली राहिल, तिही सरळ मार्गाने. सत्संग व सत्पुरुषांच्या सेवेपासून लाभ होतील. लेखक वर्गाच्या हातून प्रतिभा संपन्न लेखन होईल. परदेशगमनाची संधी मिळेल. धार्मिक मते जुन्या वळणाची असूनही नवीन विचार प्रवाहाचे स्वागत कराल.

दशमात शुक्र हा एक उत्तम शुभ योग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. ग्रामीण व शहरी असा भेद राहणार नाही.

सुख उत्तम राहिल. उद्योग, व्यवसाय, नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात (काहींना श्रमाशिवाय) विपुल धनप्राप्ती होईल. त्याचबरोबर बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहिल. विलासी साधनांची व सौंदर्याची आवड वाटेल. स्त्री वर्गापासून आर्थिक लाभ होतील. अन्य जनांनाही राज मान्यता मिळेल. नोकरी प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळेल.

स्त्रियांसाठी- दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थाजनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिला संबंधित लेख चांगले जमतील.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. आळस मात्र टाळावा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा- 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15, 19, 20, 22, 23, 24, 25, 26, 28, 30, 31.

सप्टेंबर – 2021

ग्रहस्थिती- महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी केतू, तृतीयात शनी-प्लूटो, चतुर्थात गुरु-नेपच्यून जष्ठात हर्शल सप्तमात राहू, दशमात रवी-मंगळ, लाभात बुध-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थ स्थानातील गुरुमुळे संसारात सुखी व्हाल. नावलौकीकात भर पडेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धिमा व समाधानी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही अडचणीत पराभव होणार नाही. जेष्ठ नागरिकांना याचा विशेष अनुभव येईल. जमीन-जुमला व सांपत्तीक आवक नेहमीप्रमाणे सुरळीत चालू राहिल. भाग्योदयासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. भपक्याची हौस वाटेल. पोकळ डौल मिरवण्याची हौस वाटेल. डौल मिरवण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे लोकात हसे होण्याची शक्यता आहे.

तृतीयात शनी आहे. शत्रू पक्षामध्ये फाटाफूट पाडून त्यांच्यावर मात करण्यात यश मिळेल. अचानक भाग्योदय होण्याचा योग आहे. सरकार दरबारी काम वाढेल.

ग्रहांचे सुख उत्तम राहिल. आहार सिमीत परंतु समतोल राहिल. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात विशेष प्रगती होईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सप्तमान राहू आहे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राहूचा शुक्राशी नवपंचम योग होत असल्याने अपघातातून अद्भूतपणे सुटका होईल. वैधमार्गाने पिुल धनप्राप्तीचे योग येतील.

स्त्रियांसाठी- नातेवाईक व शेजारी पाजारी यांचे संबंध चांगले राहिल्यामुळे महिलांचा स्वभाव आनंदी राहिल. गायन, वादन आदी ललित कलात प्रगती होईल. कोणतेही काम नीटनेटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान वाटेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता तीक्ष्ण राहिल त्यामुळे वार्षिक परिक्षा देणे जास्त अवघड वाटणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव जितका वाढवाल तितक्या प्रमाणात गुणांची टक्केवारी वाढेल.

शुभ तारखा- 1, 3, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 19, 21,23, 29, 30.

- Advertisment -

ताज्या बातम्या