Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मिथून Quarterly Future - Gemini

त्रैमासिक भविष्य – मिथून Quarterly Future – Gemini

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून – 2021

- Advertisement -

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात मंगळ, षष्ठात केतू, अष्टमात शनी-प्लुटो, नवमात गुरू-नेपच्यून, लाभात-हर्षल, व्ययात रवि-बुध-राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास -राशीचे अध्याक्षरे का, कि, की, कु, कू, के,को, घ, गं अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री-पुरुष युगूल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरुषाच्या हातात गदा असे आहे. राशी स्वामी बुध तत्त्व वायू असल्याने मधून मधून भडकण्याची सवय. द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. तुमच्यासाठी पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरुष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरुषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण शुद्र, स्वभाव क्रूर, प्रकृती त्रिदोष वात-पित्त युक्त.राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न पाचू , शुभ रंग हिरवा, शुभ वार बुधवार. उत्तम ग्रहणशक्ती , अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर स्वभाव बोलण्यात चातुर्य .

लग्नी शुक्र आहे व्यक्तिमत्त्वाला झळाळी येईल.हौशी व रंगेल स्वभावाची भर पडेल. नेहमी कामात दंग राहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल फार प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकता. नेहमी कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरुणांना सुंदर पत्नी मिळेल.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. महिलांसाठी सौंदर्यवर्धक सुपुत्र प्रदान करणारा कलाकौशल्यसाठी प्रगतीकारक तर आहेच शिवाय हौसमौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने लाभ घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असतील विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. आळस टाळा. गेलेला वेळ परत येणार नाही.

शुभ तारखा -2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, द्वितीयात मंगळ-शुक्र, षष्ठात केतू, अष्टमात शनी-प्लुटो, नवमात गुरू-नेपच्यून, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

नवमात गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील.लोकांना दिलेला सल्ला उपायकारक व फलदायी असल्याने उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. त्यामुळे पुष्कळ लोकांचा आधार व्हाल.

जनशक्तीच्या आधारावर व्यवसायात प्रगती होईल.

समाजात गौरव प्राप्त होईल. परदेशगमन केलेल्यांचा भाग्योदय होईल. काटकसरीची वृत्ती ठेवल्यास अडचणी येणार नाहीत. ज्योतिषशास्त्र व धर्मशास्त्राची आवड वाटेल.

षष्ठस्थानी केतू आहे. याठिकाणी केतू असता नेत्रपीडा संभवते. या स्थानातील केतू शत्रुचा नाश करेल. तुमच्यासमोर उभे राहण्याचे सामर्थ्य राहणार नाही. या ठिकाणी केतु असता बंधूशी संबंध चांगले असतील. मातृपक्षांकडून मानहानी होण्याची शक्यता आहे. साधू जणांचा सहवास घडेल.

लग्नी रवी आहे स्वभाव उदार व थोडा फ ार लोभी राहील. बुद्धी तीव्र राहील. शारीरिकदृष्ट्या पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घेतली तर गंभीर आजार होणार नाहीत.

स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे महिलांच्या हातात पैसा खेळत राहील. पतिराज खूश राहतील . मधुर बोलण्यामुळे घराकडे त्यांना फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी तुमचा हेवा करतील . सुशिक्षित सुशिक्षित महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमेश शुक्र द्वितीयात असल्याने मुलांचा कल मनोरंजनाकडे व खर्चिकपणाकडे वळण्याची शक्यता आहे. विवेक संयमाच्या आधाराने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हिताचे राहील.

शुभ तारखा – 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

ऑगस्ट – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी बुध-रवि, तृतीयात मंगळ ,अष्टमात शनि-प्लूटो, नवमात गुरू-नेपच्यून, लाभात हर्शल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. लढाऊ वृत्ती चांगली असल्याने शत्रुचा पराभव कराल. भावंडासाठी खर्च करावा लागेल. कवी वर्गाला चांगल्या कविता सुचतील.

द्वितीयात बुध आहे. सांपत्तीक भरभराट करून देईल. कमीशन बेसीसवर चालणारे उद्योग भरभराटीला येतील. लेखन, प्रकाशन, सल्ला मसलत यांपासून उत्तम धनप्राप्ती होईल. बचत शक्य होईल. पण योग्य व सुरक्षित बँका व पतसंस्थाकडे गुंतवणूक करा. अभ्यास केल्यास वक्तृत्व कलेत उत्तम प्रगती कराल. व्यापारी वर्गाला हा महिना भरभराटीचा राहील. धनप्राप्ती स्वतःच्या पराक्रमाने होईल. कोणासमोर हात पसरावे लागणार नाही. प्रवासात सामानाची काळजी घ्या.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमेश शुक्र तृतीयात आहे. सध्या परिक्षेचे दडपण नसल्याने विद्यार्थी खेळ, वाचन, टी.व्ही. , खेळ, वाचन ई चा आनंद घेतील

तसे न करता वेळेत अभ्यास करा. परीक्षेचे टेंशन येणार नाही

शुभ तारखा – 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या