Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधनवविवाहितांचा भाग्योदय होईल

नवविवाहितांचा भाग्योदय होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2020

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात मंगळ, तृतीयात हर्षल, पंचमात शुक्र-राहू, षष्ठात बुध, सप्तमात रवि, लाभात केतू-गुरू-प्लुटो व्ययात शनि अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू, गो, गे,सा, सी, सू, से, सो, दा इशी आहेत.

राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष आहे. राशी स्वामी- शनि, तत्व- वायू, राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढ्या लवकर वर चढतो तेवढ्या लवकर उतरतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग – पुरूष, तमोगुणी स्वभाव काहीसा क्रूर, प्रकृती कफ – वात- पित्त म्हणजे यापैकी कोणाचेही संतुलन बिघडले की, शारिरीक त्रास संभवतो. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे. पायाला इजा होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी.

शुभ रत्न-निलम, शुभ रंग- आकाशी,निळा व काळा. देवता शनि व हनुमान.

शुभ अंक- 7, शुभ तारखा – 8, 17,26.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईही सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. देवीची उपासना लाभदायक असेल. शत्रुवर विजय मिळेल. नवविवाहितांचा भाग्योदय होईल. ललितकला, लेखन, सट्टे, शेअर्स यापासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी – स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे आहे. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास टाळावा. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करा. प्रकृतिची काळजी घ्या.

शुभ तारखा – 2, 3, 4, 5, 7, 8, 11, 13, 15, 20, 21, 22, 23, 25, 28, 30, 31.

—————————————————————–

सप्टेंबर- 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, तृतीयात मंगळ- हर्शल , पंचमात राहू, षष्ठात शुक्र, अष्टमात बुध, लाभात केतू-गुरू-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमस्थानी रवि आहे. प्रामाणिककपणामुळे व्यापार्‍यांना भागीदारीत व नोकरी करणार्‍या लोकोना पदोन्नतीच्या रूपाने लाभ होण्याचा योग आहे. पूर्वार्धातील आनंदी वृत्तीला नंतर रागीटपणाचे गालबोट लागू नये याची काळजी घ्या. सन्माननीय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. बोलतांना कळत नकळत त्यांचा अपमान होऊ शकतो हे ध्यानात घ्या. सभेत किंव स्पर्धेत विजय मिळेल. राजकारणी लोकांना याची विशेष प्रचिती येईल.

अष्टमातील बुध शत्रुंचा नायनाट करण्यास समर्थ आहे. यशामुळे निर्माण झालेले शत्रु स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुष होतील. समाजातील प्रतिमा उंचावेल. प्रगती होईल.

व्ययात शनि आहे. धार्मिक बाबतीत स्वतःची अशी स्वतंत्र मते आहेत. तरीही ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. आळसाचा आळस करा. उत्साहाने कामाल लागा. यश तुम्हाला शोधत येईल. शनिला कष्ट करणारी व्यक्ती आवडते. फळ देतांना तो विलंब करतो पण हात आखडता घेत नाही.

स्त्रियांसाठी – पतिराजांचे उत्तम सहकार्य लाभेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेच पथ्य पाळाणे जास्त चातुर्याचे राहील. उत्साह चांगला राहिल. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुद्धीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात चांगली प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात जास्त रस वाटेल. काहींना धाडसी प्रकारच्या खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 2, 3, 4, 6, 7, 10, 13, 14, 18, 24, 25, 26, 28, 29, 30.

—————————————————————–

ऑक्टोबर – 2020

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात मंगळ, तृतीयात हर्शल, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि, नवमात बुध, दशमात केतू, लाभात गुरू-प्लुटो, व्ययात शनी अशी ग्रहस्थिती आहे.

दशमातील केतूमुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. वाहनापासून अपघात होऊ नये याची काळजी घ्या. बुद्धी तीक्ष्ण राहील. कारागिरी आवश्यक असलेली कामे चांगले जमेल. नीचांची संगती टाळावी. नसता संकटात अडकण्याची शक्यता आहे.

भाग्यात गुरू आहे. हा गुरू तुमच्यासाठी लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. वाहन खरेदीचा योग आहे. थोर लोकांचा स्नेह संपादन कराल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबर भाग्योदयास प्रारंभ होईल. चतुष्पाद प्राण्याचे सुख मिळेल. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तुंनी भरलेला असेल. अंर्तमनाने पुढे घडणार्‍या घटना आधीच कळू शकतील. एकादशातील प्लूटोमुळे आकस्मिक रितीने धनलाभ होण्याचा योग संभवतो.

स्त्रियांसाठी – नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – माता पिता गुरू वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेकचरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड आसणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात उत्तम प्रगती होईल.

शुभ तारखा – 2, 4, 9, 10, 11, 13, 17, 19, 21, 22, 24, 25, 26, 28, 29, 31.

- Advertisment -

ताज्या बातम्या