त्रैमासिक भविष्य : कुंभ

jalgaon-digital
4 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात-नेपच्यून, तृतीयात गुरू-बुध-राहू-हर्षल, चतुर्थात -रवि, षष्ठात मंगळ-शुक्र, नवमात केतू, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू, गो, गे, सा, सी, से, सो, दा अशी आहेत. राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असा आहे. राशी स्वामी शनी, तत्व- वायू, राशी स्वामी स्थिर असल्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढ्या लवकर वर चढतो तेवढ्या लवकर खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची. लिंग पुरूष, तमोगुणी स्वभाव, काहीसा क्रूर, त्रिदोष प्रकृती, राशीचा अंकल पोटर्‍यांवर आहे. पायाला इजा होऊ नये ही विशेष काळजी घ्या. शुभ रत्न निलम, शुभ रंग-आकाशी, निळा, काळा. देवता-शनी, हनुमान. शुभ अंक-8, शुभ तारखा- 7/17/26.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवीन कल्पनांचे भांडार उघडे करेल. अन्य जणांचे लक्षही जाणार नाही. अशी कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे, ललितकला, कथालेखन, वक्तृत्त्व यापासून द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शाळा नुकत्याच सुरू झाल्या असतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी चांगला उपयोग होईल. आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येत नाही.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 11, 12, 14, 1

जुलै – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शनी,द्वितीयात-नेपच्यून, तृतीयात गुरू-राहू-हर्शल, पंचमात रवि-बुध, षष्ठात शुक्र, सप्तमात मंगळ, नवमात केतू, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी राहू आहे. भांबावून टाकणार्‍या समस्यांचे उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या हा तुमच्या यशाचा बायप्रॉडक्ट आहे. जे सर्व नष्ट होतील. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमामुळे. शास्त्रसंशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल. सौख्य व विलास उपभोगावयास मिळेल. मोठ मोठ्या उलाढालीमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. ग्रामीण भागतील शेतकर्‍यांना कृषी व पशुधनापासून लाभ होईल. राहूच्या समोरील केतू भाग्यस्थानी विराजमान आहे. राहू-केतू मानवी जीवनावर बरे वाईट परिणाम करतात. भाग्यातील केतू तळागाळातील लोकांच्या सहकार्याने जीवनाच्या नावेची प्रगतीपथाकडे गतीने वृद्धी होईल. मात्र त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे. अन्यथा नौका वादळात सापडेल.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 3, 7, 8, 10, 11, 19, 23, 24, 26, 28

ऑगस्ट – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीथानी शनि,द्वितीयात -नेपच्यून, तृतीयात गुरू-राहू-हर्षल, षष्ठात रवि, सप्तमात मंगळ-बुध-शुक्र, नवमात केतू, व्ययात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयस्थानी गुरू असता मनुष्य पराक्रमशील असतो. मात्र अपेक्षेप्रमाणे सुस्थिती लवकर लाभणार नाही. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. कंजूसपणा करण्याकडे कल राहील. धनसंग्रहात अडचणी येतील. भावंडांकडून म्हणावे तसे सुख मिळणार नाही. शेजारी व मित्र यांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. राजकीय कार्यकर्ते, नेते यांना हा गुरू विशेष चांगला आहे. पराक्रत न दाखवता भाग्यवृृद्धी होईल. मात्र शत्रुसंख्या वाढेल.

व्ययात प्लूटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले तरी अध्यात्मात प्रगती होऊन मानसिक शांती मिळेल.

तृतीयातील हर्षल लेखक वर्गासाठी चांगला आहे. लेखनात सूर लागेल. प्रसिद्धी मिळेल. नावलौकीक वाढेल. ग्रंथ प्रकाशनाच्यादृष्टीने हा महिना चांगला आहे. विचीत्र स्वभावाच्या लोकांपासून दूर रहा नाही तर नुकसान होईल.

स्त्रियांसाठी – पतीराजांचे उत्तम सहाकार्य लाभेल. कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळा. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहि

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 21, 22, 28, 29

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *