Friday, April 26, 2024
Homeनगरमुलांच्या भांडणातून हाणामारी

मुलांच्या भांडणातून हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातून भिंगारमधील गौतमनगरमध्ये हाणामारीची घटना घडली. लोखंडी कोयता, रॉड, विटाने केलेल्या मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत. बुधवारी (दिनांक 24 मे) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

देविदास ऊर्फ राजू रंगनाथ भिंगारदिवे, साखरबाई रतन पाटोळे, रंगनाथ भिंगारदिवे, श्रध्दा देविदास ऊर्फ राजू भिंगारदिवे (सर्व रा. गौतमनगर, भिंगार) अशी जखमींची नावे आहेत. जखमी देविदास ऊर्फ राजू रंगनाथ भिंगारदिवे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप जगन्नाथ पाटोळे, शिवाजी दिनकर धिवर, हिराबाई जगन्नाथ पाटोळे, अंजली संदीप पाटोळे, वैशाली संतोष धिवर, शिला शिवाजी धिवर (सर्व रा. गौतमनगर) यांच्याविरूध्द मारहाण, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप पाटोळे व इतर हातात लोखंडी कोयता, रॉड, विटा घेऊन फिर्यादीच्या घरी गेले. लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातून संदीप पाटोळे याने लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली. शिवाजी धिवर याने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. साखरबाई रतन पाटोळे या भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले.

तसेच संदीप पाटोळे व इतरांनी फिर्यादीचे वडिल रंगनाथ व पत्नी श्रध्दा यांना मारहाण करून जखमी केले. मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या खिशातील 19 हजार रुपये व फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून गहाळ झाली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. आर. गारूडकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या