Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगणिताची भीती घालवण्यासाठी क्युआर कोडचा पर्याय

गणिताची भीती घालवण्यासाठी क्युआर कोडचा पर्याय

पुनदखोरे । Punadkhore

करोनाच्या संकट काळात ऑनलाईन अध्यापनातील समस्या दूर व्हावी, आपल्याला अध्यापन करणारे आपले शिक्षक आपल्या डोळ्यासमोर दिसावेत, गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून कायमची जावी म्हणून मविप्रचे शिक्षक बी. आर. पवार यांनी ऑनलाईन अध्यापनाचे गणित विषयाचे प्रत्येक प्रकरणावरील घटकाचे क्युआर कोड बनविले आहे.

- Advertisement -

गणितातील प्रत्येक प्रकरणातील हे क्युआर कोड प्रत्येक प्रकरणाला चिकटून घेतल्यास वर्गात शिक्षक शिकवत असताना न समजल्यास घरी तो क्युआर कोड स्कॅन करून पुन्हा पुन्हा बघून समजावून घेऊ शकतो. त्या क्युआर कोडमध्ये वर्गात शिकविणारे आपलेच शिक्षक असल्यामुळे तो भाग समजून घेण्यासाठी आवड निर्माण होईल.

परिणामी गणित विषयाची आवड निर्माण होऊन गणीतविषयी वाटणारी भीती दूर होईल. ज्याच्याकडे फोन नाही तो विद्यार्थीसुद्धा आपल्या खिशात क्युआर कोड घेऊन आपल्या मित्राकडे जाऊन मित्राच्या पालकांच्या फोनच्या मदतीने तो केव्हाही आपल्याला हवा तो घटक समजावून घेऊ शकतो. या क्युआर कोडच्या माध्यमातून गणित विषयाची अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया सतत अखंडपणे चालणारी आहे.

संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांची विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी म्हणून अनेक नवीन नवीन उपक्रम संस्थेत राबवीत असतात. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. बागुल यांच्या मार्गदर्शनामुळे नेहमीच प्रोत्साहन मिळत असते.

ग्रामीण भागात क्युआर कोडच्या माध्यमातून विदयार्थ्याना अध्यापनाचा पर्याय शोधून काढणार्‍या बी. आर. पवार यांचे तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या