Friday, April 26, 2024
Homeक्रीडाTokyo Olympics: हॉकीत भारत उपांत्यपूर्व फेरीत, सिंधूची आगेकूच

Tokyo Olympics: हॉकीत भारत उपांत्यपूर्व फेरीत, सिंधूची आगेकूच

टोकियो

भारतीय पुरुष हॉकी (Hockey India) संघाचा दिमाखदार विजय आणि बॅडमिंटनमध्ये (badminton) महिला एकेरीत पीव्ही सिंधूची (pv sindhu) दमदार कामगिरीनं आजच्या दिवसाची भारताची सुरुवात दमदार झाली. बॉक्सिंगमध्ये (boxing) सतिश कुमारनेही विजयी पंच मारत पुढची फेरी गाठली. तिरंदाजीमध्ये अतनू दासने माजी ऑलिम्पिक चॅम्पियनला नमवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

HSC Result : बारावीचा निकाल या तारखेला लागणार कारण…

बॅडमिंटन : बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची (pv sindhu)क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने डेन्मार्कच्या मिया विरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवला.

हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Hockey India) जबरदस्त कामगिरी सुरू ठेवली आहे. आज झालेल्या लढतीत भारताने रियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिनावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताने (Hockey India) या लढतीत अर्जेंटिनाचे आव्हान 3-1 अशा फरकाने परतवून लावले आहे. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये विवेक सागर आणि हरमनप्रीत सिंग यांनी केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले. 37 वर्षानंतर भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये 3 सामने जिंकता आले आहेत. अखेरच्या वेळी भारताने 1984 मध्ये भारताने हा पराक्रम केला होता.

बॉक्सिंग : 91 + किलो हेवीवेट प्रकारात सतीश कुमारने नोंदवला विजय, मेडलच्या शर्यतीतील दावेदारी पक्की करण्यासाठी त्याला आता एका विजयाची गरज आहे. सतिश कुमारने जेमेकाच्या ब्राउन रिचर्डोला 4-1 असे पराभूत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या