Wednesday, May 8, 2024
Homeनाशिककलेत करिअर करा: बाळदे

कलेत करिअर करा: बाळदे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

शिल्प व चित्रकलेतून स्मरणशक्ती (Memory), कल्पनाशक्ती (imagination), कल्पकता (ingenuity), कौशल्य (skills) या उपजत गुणांचा विकास होतो व खर्‍या अर्थाने बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास (Personality development) होत असतो.

- Advertisement -

त्यातून अर्थाजनही मिळण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे कलेची करिअर (Career) म्हणून निवड करण्याचे प्रतिपादन माजी विद्यार्थी व मूर्तिकार अमित बाळदे (Sculptor Amit Balde) यांनी केले.

येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय (Sarda School) व चांडक कन्या विद्यालालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा (Environment Complementary Ganesh Idol Workshop) पार पडली. त्यात विद्यार्थ्यांना (students) मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपिठावर शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय, मुख्याध्यापिका रेखा हिरे उपस्थित होते. आकर्षक मूर्ती साकारुन पर्यावरणाचे रक्षण करा.

मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या (Ganesha idols) पूजनाचा संदेश आपले नातेवाईक, मित्रमंडळी, शेजार्‍यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन क्षत्रिय यांनी केले. पर्यावरणाला हानी पोहचवणार्‍या गणेश मुर्ती न बसवता प्रत्येकाने शाडू मातीपासून बनवलेल्या मुर्तीच बसवल्या पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्यांने हा संदेश घरोघरी पोहचवला पाहिजे असे पंडित म्हणाले.

यानंतर बाळदे यांनी शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले. दोन-तीन प्रकारे गणेश मूर्ती तयार करुन दाखविल्या. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक गणेश मुर्ती तयार करुन त्या आपल्या घरी बसवणार असल्याची शपथ यावेळी घेतली. प्राचार्य अरुण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. राहुल मुळे यांनी सूत्रसंचलन केले. मिनल फळे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या