Friday, April 26, 2024
Homeजळगावपीककर्ज वितरणाचे उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह

पीककर्ज वितरणाचे उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्य शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुलेे कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकीत पीककर्जदार शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणार्‍यांना प्रोत्साहन योजना लाभाची देखील घोषणा झाली होती. कर्जमुक्तीच्या घोषणेनुसार जिल्हयात 1 लाख 74 हजार शेतकर्‍यांना कर्जमुक्ती योजनेव्दारे लाभान्वित करण्यात आले आहेे.

- Advertisement -

परंतु, कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांना नव्याने कर्ज उपलब्ध झाले असले तरी आधारप्रमाणीकरणासह पॅनकार्डमुळे कर्जमाफी रखडल्याने कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 15 हजारांच्यावर शेतकर्‍यांचा लाभ खात्यावर मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जिल्हयात अजुनही 15 ते 18 हजार शेतकरी नवीन कर्ज लाभापासून वंचित आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 200च्या वर शाखा असून ग्रामीण स्तरावर शेतकर्‍यांना अल्प मुदत पीक कर्जासाठी अर्थपुरवठा करतात, अशा 877 विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या शाखा या जिल्हा बँकेशी संलग्न आहेत. दोन लाख रुपये मर्यादेपर्यत सुमारे 1 लाख 74 हजार शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरले आहेत.

पीककर्ज पुरवठा

यंदा 333990.59 लाख रूपये खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 20 एप्रिलपासूनच शेतकर्‍यांना कर्जपुरवठ्यानुसार आतापयर्ंत 1 लाख 27 हजार शेतकर्‍यांना सुमारे 1000 कोटी रूपये नव्याने खरीप पीककर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून खरीपांच्या पेरण्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. असे असतांना कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापयर्ंत सरासरी 20 टक्के खरीप पीककर्ज पुरवठा जिल्हयात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या