Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाफेड कडून कमी दरात कांदा खरेदी; शेतकऱ्यांमध्ये रोष

नाफेड कडून कमी दरात कांदा खरेदी; शेतकऱ्यांमध्ये रोष

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल २२७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर वाढल्याचे दिसले मात्र नाफेडने कांदा दर वाढवण्याऐवजी 125 रुपये प्रतिक्विंटरने दर कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल ने कांदा खरेदी केला जाईल असे जाहीर केले मात्र आठ ते दहा दिवसांमध्येच त्यांनी कांदा खरेदीचा दर कमी करत 2274 रुपये प्रतिक्विंटल असा केल्याने फसवणूक झाल्याचे शेतकरी वर्गामध्ये बोलले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भावात किंचित सुधारणा

दरम्यान आज येथील बाजार समितीच्या आवारात 1042 वाहना मधील 14 हजार 978 क्विंटल कांद्याचा लिलाव झाला किमान 801कमाल 2491सरासरी 2351 रुपये दराने विक्री झाली काल बुधवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात 100 ते 250 रूपये भावाने विक्री झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या