Saturday, April 27, 2024
Homeजळगावकापूस खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा

कापूस खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात कापूस वेचणी हंगाम जवळजवळ अर्धा संपुष्टात आला असून जिल्हयात निम्मेच्यावर कापसाची खरेदी खाजगी व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात आल्यानंतर नेहमीप्रमाणे सीसीआय कडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

या कापूस खरेदी केंन्द्रांवर मोठया प्रमाणावर शेतकर्‍याकडून टॅ्रक्टर, टेम्पो, मिनीडोअर, बैलगाडी आदी वाहनांच्या मोठया रांगा दिसून येत आहेत.

दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात कापूस खरेदी सुरू करण्यात येते परंतु मात्र राज्य शासनाकडून नेहमीप्रमाणे वराती मागून घोडे असल्याप्रमाणे पणन महासंघाकडून अद्यापही कापूस खरेदीला मुहूर्त मिळालेला नसून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहात कापूस खरेदीस सुुरूवात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गतवर्षी अतीपावसामुळे इतर खरीप पिकांसह कापूस हेंगाम लांबणीवर पडला होता. तर त्यानंतर लगेच फेब्रुवारीमधे चिनीमधे करोना प्रादूर्भावामुळे कापसाची निर्यात बंद असल्यामुळे आणि देशात देखिल कोरोना प्रादूर्भावामुळे लॉकडाउन संचारबदी लागू करण्यात आल्याने दोन ते तीन वेळा कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.

यावर्षी कापूस उत्पादन बर्‍यापैकी येण्याची अपेक्षा असतानाच अतीपावसामुळे कापसाची बोंडे उमलण्याअगोदरच काळी पडून हाती येणार्‍या कापसाचे उत्पादनाच मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यावर्षी कापूस खरेदी हंगाम दिवाळीपूर्वीच नोव्हेंबर सुरूवातीला करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. परंतु यंदा दिवाळीनतर देखिल कापूस खरेदी केंन्द सुरू करण्यात आलेली नाहीत.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आव्हाणे शिवारातील दोन जिनींग प्रेसिंग फॅक्टरीवर कापसाची खरेदी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी वाहनांच्या रांगा लावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या