Thursday, April 25, 2024
Homeनगरकृषी विधेयक जनतेला समजावून सांगण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे - पुराणीक

कृषी विधेयक जनतेला समजावून सांगण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे – पुराणीक

अकोले |प्रतिनिधी| Akole

शेतकर्‍यांना फायदेशीर असणारे कृषी विधेयक शेताच्या बांधावर जाऊन जनतेला समजावून सांगण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे,

- Advertisement -

असे मत भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणीक यांनी व्यक्त केले.

अकोले येथे भाजपा कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत श्री. पुराणिक बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, वसंतराव मनकर, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, सुरेश लोखंडे, निशिगंधा नाईकवाडी, गोरख पथवे, सीताबाई गोंदके, माधवी जगधने, अलका अवसरकर, दिलावर शेख आदी उपस्थित होते.

श्री. पुराणीक म्हणाले, भाजपा हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष आहे. शेतकर्‍यांना फायदा व्हावा यासाठी कृषी बिल आणले असून विरोधक त्याचे राजकारण करीत आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांसोबत संवाद साधणार आहेत त्या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक गावात करा, असेही आवाहन श्री. पुराणिक यांनी केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी कृषी विधेयकाचे फायदे शेतकर्‍यांना समजावणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सोशल मीडिया प्रत्येक कार्यकर्त्यांनी अभियान चालवावे, असे आवाहन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांनी मोदी सरकारने देशाच्या हिताचे अनेक निर्णय सामान्य जनतेसाठी घेतले.

मग शेतकर्‍यांच्या अहिताचा निर्णय कसा घेऊ शकतो पण विरोधक जनतेत भ्रम निर्माण करीत आहे. घरकुल योजना, जनधन योजना, शौचालय योजना गरिबांसाठी राबविल्या आहेत. कोणी भाऊ, दादाचे कार्यकर्ते होण्यापेक्षा भाजपाचे कार्यकर्ते व्हा अन् वैभवराव पिचड यांना आमदार करा असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना श्रद्धांजली वाहताना सिताराम भांगरे यांनी अनेक आठवणी जागवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. यावेळी सरचिटणीस यशवंतराव आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, अकोले शहराध्यक्ष सचिन शेटे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शारदा गायकर, सरचिटणीस वैशाली जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, सरचिटणीस सुशांत वाकचौरे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाजीम शेख, सहकार आघाडी संयोजक सोमनाथ मेंगाळ, उपाध्यक्ष गणेश पोखरकर, सचिव विद्या परसुरामी, रेश्मा गोडसे, आदींनी कार्यक्रम यशस्वी केला.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी गोवारी समाजाला अनुसूचित जमातीत घुसविण्यास विरोध केला व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडले. यावर आज सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला याबद्दल अ‍ॅड. वसंतराव मनकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला त्याला अनुमोदन देताना उपसभापती दत्ता देशमुख म्हणाले, मधुकरराव पिचड यांचे आदिवासी समाजासाठी कार्य खूप आहे. बोगस अदिवासी घुसखोरी रोखणे, प्यासा कायदा करणे, आदिवासी समाजासाठी वेगळे नऊ टक्के बजेट करणे अशी विविध कामे सांगून अनुमोदन दिले. अनुमोदन देताना सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी मधुकरराव पिचडांनी आदिवासी समाजाचा विकास अन् सामाजिक कार्य केले आहे. पण कोणताही जातीयवाद न करता नारायण राणे समितीमध्ये मराठा आरक्षणाच्या कायद्यावर पहिली सही केली. आदिवासी मराठा अथवा इतर समाजात तेढ निर्माण केली नाही अथवा अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा वापर केला नाही,असे सांगून अनुमोदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या