Friday, April 26, 2024
Homeनगरपुणतांबा-वाकडी रस्त्याच्या कामासाठी निवडणुकीवर बहिष्कार

पुणतांबा-वाकडी रस्त्याच्या कामासाठी निवडणुकीवर बहिष्कार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा-वाकडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून जोपर्यंत साडेसात किलो मीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. येथून पुढे निवडणूक कार्यक्रमावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी रस्ता दुरुस्तीकरिता आमरण उपोषण करण्यात आले होते. परंतु गेल्या वर्षभरात त्याची कोणतीही दखल शासनाने घेतली नाही. सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. बाभळेश्वर, राजुरी, वाकडी, येलमवाडी, कोल्हार येथे जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता असून पुणतांबा व रामपूरवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी येथे आहे. दररोज तीन ते चार हजार ग्रामस्थांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे. चारशे ते पाचशे शालेय विद्यार्थी दररोज ये-जा करतात. परंतु या रस्त्याची दुरवस्था पाहून कोणालाही दया येत नाही. सर्व लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन वेळ मारुन नेतात. म्हणून पुणतांबा वाकडी रोडला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून उपस्थित शेतकरी बांधवांच्यावतीने ठराव संमत करण्यात आला.

या आंदोलनात नामदेवराव धनवटे, शेतकरी मित्र विनोद धनवटे, ज्ञानेश्वर धनवटे, भास्कर घोडेकर, सोपानराव धनवटे, सुधाकर घोडेकर, मनोज घोडेकर, हरीष पेटकर, सोमनाथ पेटकर, सतिश धनवटे, महेश बोर्डे, बाळासाहेब धनवटे, राजेंद्र घोडेकर, मनोज घोडेकर, विक्रम शिंदे, संतोष जोगदंड, संतोष धनवटे, सुनील धनवटे, पुंजा धनवटे, राजेंद्र घोडेकर, गणेश घोडेकर, सुनील घोडेकर, राजेंद्र पेटकर, ताराचंद शेलार, महेश डोखे, भारत शेलार, विजय गाडेकर, वाल्मिक घोडेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या