Monday, April 29, 2024
Homeनगरपुणतांबा सोसायटीचे संचालक अज्ञातस्थळी रवाना

पुणतांबा सोसायटीचे संचालक अज्ञातस्थळी रवाना

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील पुणतांबा नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणुकीच्या वेळी संचालकांची पळवापळवी होऊ नये म्हणून परिवर्तन पॅनेलने विशेष खबरदारी म्हणून काल दुपारी बारा बाजता 9 पैकी 6 संचालक सहलीच्या निमिताने अज्ञातस्थळी रवाना केले.

- Advertisement -

येथील पुणतांबा नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या मंगळवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राहाता येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ही निवडणूक होणार आहे. पुणतांबा नं 2 याा सोसायटीची नुकतीच 5 मार्च रोजी 13 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनेलला 9 जागा मिळाल्या असून सतारूढ विखे प्रणित जनसेवा पॅनेलला 4 जागा मिळाल्या आहेत.

या सोसायटीत अनेक वर्षानंतर सत्तातंर झाले आहे. दोन्ही पॅनेलला त्यांच्या श्रेष्ठींचा आशीर्वाद आहे. मात्र सोसायटी ताब्यात ठेवण्यासाठी जनसेवा मंडळानेही कंबर कसली आहे. निवडणुकीच्या वेळी संचालकांची पळवापळवी होऊ नये म्हणून परिवर्तन पॅनेलचे नेते माजी सरपंच सुधाकर जाधव यांनी विशेष खबरदारी म्हणून काल दुपारी बारा बाजता 9 पैकी 6 संचालक सहलीच्या निमिताने अज्ञातस्थळी रवाना केले आहे. काही कारणामुळे तीन संचालक पुणतांबा येथे थांबले आहे.

त्यांच्या पॅनेलच्या सर्व संचालकांनी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. मात्र निवडून आल्यावर काही संचालक आ. विखे तसेच आ. आशुतोष काळे यांच्या गटाचे असल्याचे म्हणायला लागल्यामुळे परिवर्तन पॅनेलच्या नेतृत्वाने अगोदरच सावधगिरीचा पावित्रा घेतला आहे. त्यातच चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी श्रेष्ठी कोणाची निवड करतात याकडे लक्ष लागून आहे.

चेअरमनपदी सुधाकर जाधव यांचे नाव निश्चीत झाल्याची चर्चा आहे. तर व्हाईस चेअरमनपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या