Friday, April 26, 2024
Homeनगरपुणतांबा रेल्वे स्टेशनच्या सर्व प्रश्नावर विचार करून निर्णय घेणार - लाहोटी

पुणतांबा रेल्वे स्टेशनच्या सर्व प्रश्नावर विचार करून निर्णय घेणार – लाहोटी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा जंक्शन रेल्वे स्टेशन व जलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ग्रामपंचायत प्रवासी संघटना, आशा केंद्र व ग्रामस्थांचे निवेदन स्विकारल्यानंतर ते बोलत होते. पुणतांबा जंक्शन रेल्वे स्टेशवर सर्व जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे तसेच रिझर्व्हेशन सुविधा सुरू करावी. इंजि. गेट क्र. 57 च्या भुयारी मार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करावे. गेट क्र. 58 च्या भुयारी मार्गाचे काम लवकर सुरू करावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी तर पुणतांबा परिसर प्रवासी संस्थेने विविध मागण्यांचे निवेदन अध्यक्ष विजय धनवटे यांनी दिले. चांगदेवनगरच्या ग्रामस्थांच्या वतीने कामगार नेते सुभाष कुलकर्णी, मनसेच्यावतीने शहरप्रमुख संदिप लाळे, अ‍ॅड. संधाताई थोरात, डॉ. सुधाकर जाधव यांनी निवेदने दिली.

प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष विलास बोर्डे, सरचिटणीस संजय जोगदंड, खजिनदार संतोष चोरडिया, बाळासाहेब कुलट, भारत बोर्डे, दिलीपराव कांबळे, शिवसेनेचे नेते अनिल नळे, आश केंद्राचे किशोर कदम, सर्जेराव जाधव, विकास आघाडीचे चंद्रकांत वाटेकर, अ‍ॅड. संध्याताई थोरात, ग्रामपंचायत सदस्य योगेश घाटकर, आबासाहेब नळे, अशोक गायकवाड, बाजीराव धनवटे, विलास टिळेकर, शौकत शेख, शिवसेनेचे भास्कर मोटकर, शिवसेना शहर प्रमूख महेश कुलकर्णी, अनिल निकम, वाल्मिक घोडेकर, सचिन सगळगिळे, विलास कुर्‍हाडे, बाळासाहेब वहाडणे, सुरेश गोर्‍हे, रामभााऊ जाधव, सुभाष शिंदे, मधुकर जगदाळे, सेवानिवृत्त सैनिक मेजर शिवाजी वाघमारे, विलास कुलकर्णी, सुखदेव आहिरे, वसंत पवार, संजय लांडगे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या