Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांबा परिसरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

पुणतांबा परिसरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर पुणतांबा येथील रेल्वे फाटकाच्या पुढे काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वांना दिसेल,

- Advertisement -

वाचता येईल व समजेल अशा स्पष्ट भाषेत जाहीर सूचनेचा फलक लावलेला आहे. मात्र या फलकाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे. बहुतांशी रस्त्यांवर अनेकांनी मनमानी पद्धतीने अतिक्रमणे करून हे रस्ते गिळंकृत करण्याचा सपाटा लावलेला आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अत्यंत अरूंद झाले असून त्यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुंबई महामार्ग कायदा 1955 तसेच शासन परिपत्रकान्वये शासनाच्या मालकीच्या या रस्त्याची हद्द रस्त्याच्या मध्यापासून प्रत्येक बाजूस 15 मीटर (50 फूट) इतक्या अंतरापर्यंत आहे. या जागेत अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कार्यकारी अभियंता यांच्या नावाने फलक कायमस्वरूपी लावलेला आहे.

मात्र या फलकाला न जुमानता पुणतांबा गावाला जोडणार्‍या बहुतांशी रस्त्यावर अनेकांनी मनमानी पद्धतीने अतिक्रमणे करून हे रस्ते गिळंकृत करण्याचा सपाटा लावलेला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाचे या बाबीकडे का दुर्लक्ष आहे? याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. पुणतांबा-कोपरगाव रस्त्यावर तर सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा पकडून गाळे बांधून ते विकण्याचा काहींनी दिवसाढवळ्या व्यवसायच सुरू केला आहे.

रस्ता अरुंद झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यानजीक भिंती तसेच लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी पुणतांबा गावाला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांची पाहणी करून वस्तुस्थिती समजावून घ्यावी व नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या