Friday, April 26, 2024
Homeराजकीय...मग 'मेहुलभाई' देशातून पळाला कसा?; नवाब मालिकांचा खोचक सवाल

…मग ‘मेहुलभाई’ देशातून पळाला कसा?; नवाब मालिकांचा खोचक सवाल

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई…मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी म्हंटल आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई…मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? तसेच, ‘जेवढी तत्परता आता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुल चोक्सी पळून जाताना त्याला पकडण्यासाठी का दाखवण्यात आली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

‘मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय’ याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मेहुल चोक्सी यांना आणताय ठीक आहे परंतु नीरव मोदी… विजय मल्ल्या… सुशील मोदी यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

डोमिनिका जेलमध्ये अटकेत असलेला फरार मेहुल चोक्सीला डोमिनिका न्यायालयाने दणका दिला आहे.पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अवैध मार्गाने देशात प्रवेश केल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या