Friday, April 26, 2024
Homeनगरपंजाबचा गुन्हेगार शिर्डीत जेरबंद

पंजाबचा गुन्हेगार शिर्डीत जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंजाब राज्यातील जालंधर येथे गोळीबार करून शिर्डीमधील हॉटेलमध्ये लपलेल्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पुनित ऊर्फ पिम्पु बलराज सोनी (वय 27 रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

पुनित सोनी हा जालंधर येथे गुन्हा करून पसार झाला होता. सदरचा आरोपी शिर्डी येथे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना दिली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडगे, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, भिमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व शिर्डीतील तब्बल 133 हॉटेलची तपासणी करून आरोपी सोनीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला पंजाब पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. त्याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या