Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकखून प्रकरणातील पाच जणांना जन्पठेप

खून प्रकरणातील पाच जणांना जन्पठेप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटीतील दिंडोरी रोड येथे मागील भांडणाची कुरापत काढून तीघा मित्रांवर प्राणघातक हल्ला करून एकास ठार करणार्‍या टोळक्यातील पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.एस.बोधनकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisement -

आरिफ शेहेजान कुरेशी (रा.दिंडोरीरोड), शरद दिपक पगारे (रा.पेठरोड), रोशन जयंत पगारे (रा.समृध्दी कॉलनी, दिंडोरीरोड), अमर रंजीत गांगुर्डे (रा.विरा सोसा.दिंडोरीरोड) व जॉन उर्फ सुनिल हरी काजळे (रा.हरी कुटीर सोसा.दिंडोरीरोड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऑगष्ट २०१७ रोजी दिंडोरीरोडवरील कलानगर भागात ही घटना घडली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आठ संशयीतांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेत निखील मोरे या युवकाची निर्घुन हत्या करण्यात आली होती. मृत निखील मोरे, अमोल निकम व सुरज खोडे हे तिघे मित्र १७ ऑगष्ट २०१७ रोजी रात्रीच्या वेळी कलानगर येथील व्यंकटेश कृपा या इमारती खाली गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली होती. पाच आरोपींसह सागर उर्फ मोन्या चंद्रमोरे, चंग्या उर्फ सुजीत पगारे व अंक्या उर्फ अंकुश जाधव आदी आठ जणांच्या टोळक्याने त्यांना गाठून मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने तिघा मित्रांवर कोयत्याने हल्ला केला होता.

त्यात निखील मोरे याच्यावर वर्मी घाव घालण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला होता. तर सुरज खोडे आणि अमोल निकम गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खून,प्राणघातक हल्ला आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.शार्दुल यांनी केला होता.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.बोधनकर यांच्या न्यायालयात चालू होती. सबळ पुरावे व साक्षींवरून या खटल्यात न्यायालयाने पाच आरोपींना दोषी धरून खूनाच्या गुह्यात प्रत्येकी जन्मठेप आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली तर उर्वरीत कलमान्मवये अनुक्रमे ३,६,१८ महिने व २ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अ‍‍ॅड सचिन गोरवाडकर यांनी सरकारी वकिल म्हणून काम पाहिले. त्याना पैरवी अधिकारी हवालदार एस.वाय.ढोले व महिला शिपाई एम.एस.तेजाळे यांनी सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या