Friday, April 26, 2024
Homeनगरपुणे रोडवरील कचरा डम्पिंग बंद न केल्यास आयुक्तांच्या दालनात टाकणार

पुणे रोडवरील कचरा डम्पिंग बंद न केल्यास आयुक्तांच्या दालनात टाकणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर व उपनगरातील छोट्या गाड्यातील कचरा डिपिंगसाठी नगर-पुणे रोडवर सीनानदी परिसरात टाकण्यात येतो. या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान व तसेच हरित लवाद यांनी घालून दिलेल्या अटी व शर्ती तसेच नियमावली यांचा भंग होत असून या परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याठिकाणी डम्पिंग करण्यात येणारा कचरा लवकरात लवकर बंद करा, अन्यथा हाच कचरा मनपा आयुक्त व घनकचरा कार्यालयाच्या दालनात आणून टाकला जाईल, असा इशारा शिवराष्ट्र सेना पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी दिला आहे.

- Advertisement -

या कचरा डंपिंगमुळे दुर्गंधी युक्त पाणी, तसेच कचरा हा सीनाच्या पात्रात मिसळत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील व गावातील रहिवासी हेच पाणी भाजीपाला व इतर गोष्टींसाठी वापरत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे येथील नागरिक दवाखान्यांत अ‍ॅडमिट होतात. तसेच डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून त्याचा लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे. यामुळे मनपाने सदर स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेस त्वरित आदेश करून सीना नदी परिसरात डम्पिंग करण्यात येणारा कचरा या ठिकाणाहून हलविण्याचे आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा मनपा आयुक्त व घनकचरा कार्यालयाच्या दालनात आणून टाकला जाईल, असा इशारा मनपाला दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या