Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणे-नगर महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपायोजना युद्धपातळीवर

पुणे-नगर महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपायोजना युद्धपातळीवर

अहमदनगर |पारनेर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar| Parner

अहमदनगर – पुणे महामार्गावर अपघात रोखण्याच्या दृष्टीने उपायोजनांना सुरूवात झाली आहे. पारनेरचे तहसिलदार व पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या अल्टीमेटची बांधकाम कंपनीने गंभिर दखल घेतली असून विविध ठिकाणी रस्ता दुभाजकांची दुरूस्ती व ब्लॅकस्पॉट दूर करण्याची कामे वेगात सुरू करण्यात आली आहेत.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात सततच्या अपघातांनी मृत्यूचा सापळा बनलेल्या अहमदनगर – पुणे महामार्गाबाबत पारनेरचे तहसिलदार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे महामार्ग पोलीसचे निरिक्षक शंशिकात गीरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पारदे, सुप्याचे सरपंच योगेश रोकडे, मनसेचे अविनाश पवार, नितिन म्हस्के यांच्या उपस्थित बैठक झाली होती. यावेळी आवळकंठे यांनी सबंधीत अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले होते. तसेच उपायोजना करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आला होता.

तर मनसे पदाधिकार्‍यांनी टोल बंद करण्याची मागणी केली होती. या अल्टीमेटची गंभीर दखल महामार्ग बांधकाम कंपनी चेतक एन्टंरप्रायजेसच्या अधिकार्‍यांनी घेली. व युद्ध पातळीवर कामे चालू केली अस्लयाचे चित्र दिसत आहे. यात त्यांनी हाँटेल चालकानी फोडलेले दुभाजक दुरुस्त करणे, सुचना फलक लावने, दिशादर्शक फलक लावने, गतीरोधक बसवने, झेब्रा पट्टे मारने, साईड पट्ट्या भरणे आदी कामाना प्राधान्य देऊन ही कामे हाती घेतली आहेत.

तहसिलदार व पोलीसांच्या सुचनेनुसार कामांना वेगात सुरूवात झाली आहे. सुपा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व फोडलेले दुभाजक दुरूस्त करण्यात आले आहेत. ब्लॅक स्पॉटच्या ठिकणी आवश्यक दुरूस्त्या करण्यात येत आहेत. लवकर सर्व सुचना फलक लावण्यात येणार आहेत.

– सनित भडके, अभियंता चेतक इंटरप्रायजेस

चेतक इंटरप्रायजेस कंपनीने वेगात काम सुरू केले आहे. आम्ही या कामाची पाहणी केली आहे. कंपनीने सर्व ब्लॅक स्पॉट व दुभाजकाची सर्व कामे शेवटपर्यंत कामे पुर्ण करावीत ही अपेक्षा. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. सार्वमतनेही यात महत्वाची भूमीका बजावली आहे.

– डॉ. नितीनकुमार गोकावे

- Advertisment -

ताज्या बातम्या