Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले

पुणे |प्रतिनिधी| Pune

कचरा गोळा करणार्‍यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्याासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरूवार) दुपारी रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisement -

स्वप्नील कोठावळे असे लाच घेणार्‍या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. कचरा गोळा करणार्‍यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्याासाठी कोठावळेंनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती. प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली. पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता. त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबीच्या पथकाने केली आहे. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या