Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे पदवीधरसाठी तब्बल १०८ अर्ज तर शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज दाखल

पुणे पदवीधरसाठी तब्बल १०८ अर्ज तर शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज दाखल

पुणे |प्रतिनिधी| Pune

पदवीधर मतदार संघासाठी गुरूवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़.

- Advertisement -

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण तब्बल १०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केल़ तर शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवार अर्जांची शुक्रवारी (दि.१३) रोजी छाननी होणार आहे़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही १७ नोव्हेंबरपर्यंत आहे़. त्यामुळे माघारीनंतरच दोन्ही मतदार संघातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे़.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने पुण्यासह अन्य जिल्ह्यातून इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात येत होते.

पोलिसाकडून मास्क न घालणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात होती. यामुळे काही वाद देखील झाले. पदवीधर मतदार संघासाठी भाजपसह महाआघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. परंतु दोन्ही पक्षांना बडखोरीचे ग्रहण लागले असून, भाजपचे मित्र पक्ष रयत क्रांती संघटनेकडून प्रा. एन. डी. चौगुले यांनी तर राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रताप माने यांनी अर्ज दाखल केले आहेत. माघारी नंतर ही बंडखोरी टिकणार किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे़.

- Advertisment -

ताज्या बातम्या