Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात अग्नीतांडव! ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक

पुण्यात अग्नीतांडव! ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक

पुणे(प्रतिनिधी)

पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक झाली.

- Advertisement -

फॅशन स्ट्रीट या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत, रात्री अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर काही क्षणातच ही आग सर्वत्र पसरली आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घ्त्नास्थाली पोहचले. मात्र, आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक जवानांना मोठी शिकस्त करावी आगळी. अत्यंत दाटीवाटीने असलेली दुकाने, घरे आणि वस्ती असलेल्या या परिसरात इतकी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, यात जीवित हानी झाली नाही. मात्र, ही भीषण आग आटोक्यात आणत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्नीशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा मात्र आग विझवून घरी परतत असताना अपघाती मृत्यु झाला आहे प्रकाश हसबे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या या मृत्यूने हळहळव्यक्त केली जात आहे.

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे हसबे प्रमुख आहेत.फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात आणल्यानंतर घरी जात असताना येरवाड्याजवळ बसची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला . फॅशन स्ट्रीटला आग लागल्याच्या वृत्तानंतर हसबे हे तातडीने घटनास्थळावर दाखल झाले होते आणि या संपूर्ण बचावकार्यात पुढे होऊन मार्गदर्शन करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आग विझविण्याचे काम सुरू होते पहाटे आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, आपण 2 तासात घरी जाऊन येतो असे त्यांनी आपल्या सहकारयांना सांगितले आणि ते घराकडे निघाले होते मात्र आगीतून अनेकांना सुखरूप वाचवून आपल्या घराकडे निघालेल्या हसबे यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. हसबे यांच्या यादुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त आहे.

कॅम्प परिसरातील हा फॅशन स्ट्रीट म्हणजे पुणेकरांचे खरेदीचे आवडते ठिकाण..शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास या मार्केट मध्ये अचानक आग लागली आणि काही वेळातच सम्पूर्ण मार्केट मध्ये ही आग पसरली, या भागात मोठ्या प्रमाणात कपड्याची दुकाने आहेत, विविध फॅशन च्या कपड्यानी खच्च भरलेल्या या मार्केट मध्ये कपड्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली आणि एक एक करत शेकडो दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, आगीचा कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आणि 16 बंबाच्या मदतीने 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दरम्यान या मार्केट मध्ये अचानक आग कशी लागली यावर चर्चा सुरू आहे, दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची स्पष्टता अद्याप झालेली नाही , या भागात मोठ्या प्रमाणात कपड्याची दुकाने आहेत मात्र हॉटेल किंवा खाद्यपदार्थ बनवण्याची दुकने नाहीत त्यामुळे ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता कमी होती असे काही व्यवसायिकांना वाटते आहे, या ठिकाणी असलेल्या कपड्याच्या दुकानात हजारो रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला आहे. दरम्यान गेल्या काही काळापासून कॅम्प परिसरातील हे फॅशन मार्केट इतरत्र हलवण्याची चर्चा सुरू आहे मात्र येथील दुकांदारांचा याला विरोध आहे त्यामुळे अचानक लागलेली आग आणि काही वेळातच संपूर्ण मार्केट मध्ये भडकलेली आग यामुळे इथले व्यावसायिक शंका उपस्थित करत आहेत.इतर वेळी रात्री उशिरा पर्यत सुरू राहणारे मार्केट, सध्या कोरोना संसर्ग मुळे लवकर बंद होते , शुक्रवारी देखील रात्री साडे नऊ वाजता इथली दुकाने बंद करून व्यावसायिक घरी गेले होते मात्र काही वेळातच मार्केट ला आग लागल्याच्या वृत्ताने व्यावसायिकाचा काळजाचा ठोका चुकला, हवालदिल झालेल्या व्यवसायिकांनी फॅशन स्ट्रीट कडे धाव घेतली मात्र आगीचे स्वरूप अंत्यत भीषण होते या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही मात्र अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे ते प्रमुख आहेत.फॅशन स्ट्रीट ला लागलेली आग आटोक्यात आणल्यानंतर घरी जात असताना येरवाड्याजवळ बसची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला . फॅशन स्ट्रीटला आग लागल्याच्या वृत्तानंतर हसबे हे तातडीने घटनास्थळावर दाखल झाले होते आणि या संपूर्ण बचावकार्यात पुढे होऊन मार्गदर्शन करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आग विझविण्याचे काम सुरू होते पहाटे आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, आपण 2 तासात घरी जाऊन येतो असे त्यांनी आपल्या सहकारयांना सांगितले आणि ते घराकडे निघाले होते मात्र आगीतून अनेकांना सुखरूप वाचवून आपल्या घराकडे निघालेल्या हसबे यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. हसबे यांच्या यादुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या