Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला १० वर्षाच्या नातीने दाखवला इंगा, पुण्यातील VIDEO व्हायरल

आजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला १० वर्षाच्या नातीने दाखवला इंगा, पुण्यातील VIDEO व्हायरल

पुणे | Pune

पुण्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका आजीबाईंच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा साखळीचोराचा प्रयत्न १० वर्षांच्या नातीने उधळून लावला. तसेच चोराला चांगलाचं इंगा दाखवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या लता घाग या आजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन नातींसोबत फुटपाथवरून मुलीच्या घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या सोन साखळी चोरट्याने आजीच्या गळ्यातील चेन हिसकवण्याचा प्रयत्न केला.

पाण्याचा फुगा बेतला जीवावर, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

मात्र, जवळच्या असलेल्या १० वर्षाच्या नातीने चोरट्याचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेतला जात आहे.

Womens Day 2023 : अंधकारातून ‘ती’ नेते प्रकाशाकडे…! ‘लाईनवुमन’चा हा VIDEO पाहून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. हत्या, दरोडा, बलात्कार, चोरी अशा प्रकारच्या घटना वाढत असतानाच आता सोनसाखळी चोरांनी देखील शहरात धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात दिवसाला पाच ते सहा अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले…! WPL मध्ये बॅटवर लिहिले MSD O7, ठोकलं अर्धशतकअंधारात ‘तो’ आला अन् त्याने ११ शेळ्या-बोकडांचा फडशा पाडला

- Advertisment -

ताज्या बातम्या