Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र…अन् चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला वाजवलं राष्ट्रवादीचं गाणं; डीजेवाला पोलिसांच्या ताब्यात

…अन् चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला वाजवलं राष्ट्रवादीचं गाणं; डीजेवाला पोलिसांच्या ताब्यात

पुणे | प्रतिनिधी

दिवाळीनिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केलेल्या दिवाळीच्या फराळ कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे डीजेवरून वाजले आणि एकच गोंधळ उडाला.

- Advertisement -

याची उलट सुलट चर्चा मात्र दिवसभर सगळीकडे सुरू होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादीच प्रचारगीत ”राष्ट्रवादी पुन्हा…” अनेक कार्यक्रमांमध्ये वाजवलं जात. अनेक खासगी कार्यक्रमांमध्येही लोक या गाण्यावर ठेका धरताना दिसतात. गाण्याची चाल थिरकायला लावणारी असल्याने पक्षाचं गाणं असलं तरी ते बरंच लोकप्रिय झालं आहे. मात्र भाजपच्या पुण्यातील एका कार्यक्रमाचा हे गाणं वाजल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे गाणं वाजवलं आहे. चंद्रकांत पाटील कार्यक्रमात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत वाजलं होतं. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजेवाल्याने साऊंड सिस्टीम विनापरवाना उभारली होती, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या