पुणतांब्याची पाणी पुरवठा योजना ठाकरेंच्या दालनात

jalgaon-digital
2 Min Read

पुणतांबा | वार्ताहर

जागतिक बॅकेच्या (World Bank) सहकार्याने जल स्वराज टप्पा -२ ( Jal Swaraj Phase-2) अंतर्गत अंदाजे १७ कोटी रुपये खर्चाची पुणतांबा (Puntamba) गावच्या पूरक पाणी पुरवठा योजनेच्या तक्रारी आता थेट मनसेच्या (MNS) दालनात गेल्या आहे.

नाशिक (Nashik) येथे मनसेचे (MNS) युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) तसेच बाळा नांदगावकर (Bala Nandgavkar) यांची भेट मनसेचे तालुका अध्यक्ष राजेश लुटे, उपाध्यक्ष गणेश जाधव, विजय मोगले यांनी ठाकरे यांची भेट घेतली. पुणतांब्याचे गणेश जाधव यांनी सर्व प्रथम पुणतांबा पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाचे प्रकरण जनते समोर मांडले होते. त्याबाबद आंदोलनाचा इशारा दिला होता.

पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर आणल्यामुळे जाधव यांना दमबाजी झाली होती. त्याबाबद संबंधितावर राहाता पोलीस स्टेशनला (Rahata Police Station) गुन्हा दाखल झाला होता. नंतर जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. तरी सुद्धा जाधव यांनी न घाबरता हे प्रकरण लावून धरले आहे. अखेर माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे (MLA Radhakrishn Vikhe), आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale), मा आ सौ स्नेहलता कोल्हे (Former MLA Senhlata Kolhe) यांनीही ह्या प्रकरणाची दाखल घेऊन कामाची चौकशी केली होती.

आता हे प्रकरण ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतले व त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर बाळा नांदगावकर यांनी पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला. याचा परिणाम म्हणजे जाधव यांच्यांशी नाशिक जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क सुद्धा साधला आहे असल्याची माहिती गणेश जाधव यांनी दिली आहे. दरम्यान पुढील आठवडयात पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची माहिती देण्यासाठी गणेश जाधव व त्यांचे सहकारी कृष्णकुंजवर (Krushnkunj) जाऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *