Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशपाण्याच्या टाकीत 52 किलो स्फोटकं

पाण्याच्या टाकीत 52 किलो स्फोटकं

श्रीनगर | srinagar –

भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये हायवेजवळ 52 किलो स्फोटकं जप्त केली असून पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यात

- Advertisement -

भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ला झाला होता तेथून काही अतंरावर इतका मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध करत दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजता सर्च ऑपरेशन सुरु असताना एका बागेत पाण्याची टाकी पुरुन ठेवण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. या पाण्याच्या टाकीत जवळपास 52 किलो स्फोटकं सापडली. जवळपास 416 पाकिटं होती. यामधील प्रत्येक पाकिटात 125 ग्राम स्फोटकं होती. अजून शोध घेतला असता अजून एक टँक सापडला ज्यामध्ये 50 डिटोनेटर होते. या स्फोटकांना सुपर 90 म्हटलं जातं.

महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला होता तेथून फक्त नऊ किमी अंतरावर ही स्फोटकं सापडली आहेत. 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यातील 14 तारखेला आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या कारने सुरक्षा ताफ्याला धडक दिली होती. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या