Friday, April 26, 2024
Homeनाशिकवाजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण

वाजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण

वाजगाव l Vajgaon (वार्ताहर)

वाजगाव येथे आज (दि.३१) रोजी प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथील पुरोहित सचिन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

- Advertisement -

करोनाच्या दिर्घ काळानंतर आज प्रथमच प्लस पोलिओ लसीकरण (डोस) मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरनांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांना दोन दिवस आधी प्रत्यक्ष घरी जाऊन लसीकरण पावतीचे वाटप करण्यात आले होते.

यासाठी वाजगाव व वडाळे गावातील साधन चारशेहून अधिक बालकांना तीन वेग वेगळ्या ठिकाणी पोलिओ बूथच्या माध्यमातून लसीकरण करण्याचे आयोजन येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्रतर्गत करण्यात आले आहे.

पोलिओ लसीकरणासाठी प्रशांत सोनवणे आरोग्य सेवक, मीनाक्षी पगार आरोग्य सेविका, आशा कर्म. ज्योती आहेर, प्रमिला मगर, ज्योती केदारे, सीमा मोरे, अलका महाले, अलका बच्छाव, मनीषा देवरे, मनीषा उशीरे, स्वप्नाली देवरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या