Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककार्तिक स्वामी मंदिरात पूजा

कार्तिक स्वामी मंदिरात पूजा

पंचवटी । प्रतिनिधी

पंचवटीतील ( Panchavati ) काळाराम मंदिराशेजारील श्री कार्तिक स्वामी मंदिरात एकादशीपासून षष्ठीपर्यंत दररोज सकाळी पूजाविधी व अभिषेक कार्यक्रम संपन्न होत आहे.

- Advertisement -

रविवारी षष्ठीनिमित्त कार्तिक स्वामी मंदिरापासून कपालेश्वर मंदिरापर्यंत सर्व धार्मिक भाविक भक्तांची शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झाली. कपालेश्वरवरून आल्यानंतर श्री कार्तिक स्वामींना अभिषेक करण्यात आला व विधिवत पूजा करण्यात आली.

तामिळनाडूसह मुंबईवरून अनेक भाविक भक्त कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्तिकी एकादशीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या