Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाविकास आघाडी सरकारकडून जनहिताची कामे : थोरात

महाविकास आघाडी सरकारकडून जनहिताची कामे : थोरात

संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aaghadi Government )राज्यात अस्तित्वात आले. कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकर्‍यांना दोन लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले. हे काम राज्यासाठी कायम स्मरणात राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केले.

- Advertisement -

येथील वसंत लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपिठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, बाजीराव खेमनर, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र नागवडे, नगरचे शहराध्यक्ष किरण काळे, करण ससाने, सचिन गुजर, स्मितल वाबळे, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर उपस्थित होते.

1985 पासून तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली. प्रवरेच्या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करुन 30% पाणी मिळवले. जनतेचे प्रेम आणि काँग्रेस नेतृत्वाचा मोठा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक मंत्रीपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असे काम केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री पदाच्या काळात तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळविला.

निळवंडे कालव्यांसाठी हजारो कोटी निधी मिळवला असून रात्रंदिवस काम सुरु असल्याचे थोरात म्हणाले. निळवंडे धरण, कालवे, पाणी हे काम आपणच केले असून याची इतिहास नोंद घेईल. यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला हे सर्वश्रुत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सरळ आहे. त्यांनी अनेकवेळा विश्वास टाकल्याने त्यातून महाविकास आघाडी सरकारमधून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आल्याचे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हिताचे कामे करत होती. यापुढील काळातही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. देशात सध्या धार्मिकतेच्या नावावर मतभेद केले जात आहे. विकास कामे सोडून धार्मिक मुद्दे जनतेपुढे आणले जात आहे. हे दुर्दैवी असल्याचे आ.तांबे म्हणाले. प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या