Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसार्वजनिक स्वच्छतागृहच उघड्यावर; नगरपरिषेचे दुर्लक्ष

सार्वजनिक स्वच्छतागृहच उघड्यावर; नगरपरिषेचे दुर्लक्ष

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराच्या (Bhairavnath Maharaj Temple) समोरील सार्वजनिक स्वच्छतागृहाची (Public toilets) समोरील भिंत पडल्याने हे शौचालय उघड्यावर आले आहे.

- Advertisement -

ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे स्वच्छतागृहाच्या बांधकामानंतर काही महिन्यातच ही भिंत पडल्याने परिसरातील महिलांची कुचंबना होत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून (Municipal Administration) याकडे साफ दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी परिसरातील व्यावसायिकांकडून लघूशंकेसाठी (Urination) स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आल्यानंतर भैरवनाथ महाराज मंदिरासमोर नगर परिषदेच्या गाळ्यांच्या शेजारील जागेवर पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. हे स्वच्छतागृह सरस्वती नदी (Saraswati river) पात्राला अगदी लागून बांधण्यात आले असून ठेकेदाराकडून (Contractor) अगदी निकृष्ठ दर्जाचे काम केल्याचा आरोप परिसरातील व्यावसायिक करत आहेत.

भरीव पाया न घेताच स्वच्छतागृह उभारण्यात आल्याने काही दिवसांतच या स्वच्छतागृहाला उतरती कळा लागली. बांधकामानंतर काही महिन्यातच स्वच्छतागृहात जाण्याच्या आधी आडोसा व रस्त्यावरुन जाणार्‍यांना स्वच्छतागृहाच्या आतील चित्र दिसू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच कोसळल्याने हे स्वच्छतागृह उघड्यावर आल्याचे चित्र आहे.

याठिकाणी एक बाजूला पुरुष तर एक बाजूला महिलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, समोरील भिंतच कोसळल्याने आत लघूशंका करणारे चेहरेच दिसू लागले असून त्याठिकाणी जाण्यास परिसरातील व्यावसायिक कानाडोळा करु लागले आहेत. पुरुष एकवेळ या ठिकाणी जातात. मात्र, परिसरातील अनेक महिला व्यावसायिक व बाजारात खरेदी करण्यासाठी येणार्‍या महिलांना तेथे जाणे अवघड होत आहे. नगर परिषदेने स्वच्छतागृहाच्या पडलेल्या भिंतीचे त्वरीत बांधकाम करावे व बांदकामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घ्यावी अशी मागणी परिसरातील व्यावसाईकांनी केली आहे.

स्वच्छतागृहच कोसळण्याची भिती

सरस्वती नदीपात्रालगत हे स्वच्छतागृह बांधण्यात आल्याने याचे बांधकाम योग्य पध्दतीने झाले नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. नदीपात्रातील घाणीमुळे येथे अनेक उंदरांचा वावर असल्याने हे उंदिर हळूहळू स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची माती पोखरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही वर्षांत हे संपूर्ण स्वच्छतागृहच कोसळण्याची भिती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

मद्यपींकडून मोडतोड

दोन वर्षांपूर्वी नगर परिदेने याठिकाणी स्वच्छतागृहाची निर्मिती केल्यानंतर आतमध्ये लघूशंकेचे भांडे, हात घुण्यासाठी बेसिन, नळ, आरसे बसवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच लघूशंकेसाठी येणार्‍या काही मद्यपींंनी भांड्याची तोडफोड करत बेसीन, नळ, आरशांची चोरी केल्याचे समोर आले. हे मद्यपी चक्क स्वच्छतागृहातच येऊन दारु पित असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. स्वच्छतागृह परिसरातही अनेक दारुच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत असल्याने अशा ठिकाणी महिला जाण्यासही धजावत नसल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या