Friday, April 26, 2024
Homeनगरजनसंपर्क पदाच्या मुलाखती अखेर पार पडल्या; प्रतीक्षा नियुक्तीची

जनसंपर्क पदाच्या मुलाखती अखेर पार पडल्या; प्रतीक्षा नियुक्तीची

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीचे साईबाबा संस्थान बहुचर्चित रिक्त जनसंपर्क पदासाठी साईबाबा सस्थानने कायम कामगारांमधून प्रभारी अधिकारी म्हणून अर्ज मागविण्यात आले होते,

- Advertisement -

जवळपास 25 पैकी 20 कामगारांनी मुलाखती दिलेल्या आहेत. मात्र या पदावर कोणाची नियुक्ती होते. याकडे साईबाबा संस्थान कामगारांसह ग्रामस्थ साईभक्ताचे लक्ष लागले आहे.

जनसंपर्क या पदासाठी अनेकांनी आपल्या पध्दतीने फिल्डिंग लावली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर झालेला गाजावाजा आरटीआयच्या कार्यकर्ते यांनी घातलेले लक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची ठोस भुमिका यामुळे सहजपणे मिळणार्‍या संधीवर काहींना पाणी सोडावे लागले. याच पदासाठी काहींनी थेट संगमनेर तर कधी लोणीच्या माध्यमातून देखील जोरदार प्रयत्न केलेले आहेत.

आता कार्यकारी अधिकारी हे जनसंपर्क अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रतेला महत्त्व देणार का? या बरोबरच राजाश्रयीत उमेदवाराला संधी मिळते की काय? याकडे जसे इतराचे लक्ष लागले आहे तसे आरटीआय कार्यकर्ते संजय काळे, यांचे देखील लक्ष याकडे लागले आहे.या पदासाठी संधी देताना नियमावलीचे पालन झाले पाहिजे. यासाठी त्यांनी राज्य प्रधान सचिव व विधी व न्याय विभागाचे लक्ष वेधले असून योग्य त्या उमेदवारालाच संधी मिळेल यावर त्यांचा विश्वास आहे.

जनसंपर्क अधिकारी यांना चार ते पाच भाषा येणे गरजेचे आहे. उच्चशिक्षित व पत्रकारितेचा कोर्स झालेला उमेदवार असावा व सर्व क्षेत्राची माहिती असावी, असेही साईभक्तांमधून बोलले जात आहे. त्यामुळे आता या पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामधून कोणाची वर्णी लागते याकडे सर्व साईभक्त शिर्डीकर व संपूर्ण देश-विदेशातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या