Monday, April 29, 2024
Homeनाशिकसावनाची कार्यकारिणी जाहीर

सावनाची कार्यकारिणी जाहीर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालयाच्या (Public Libraries) नूतन कार्यकारी मंडळाच्या (executive board) पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू (Girish Natu as the Chairman), प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके (Dr. Dharmaji Bodke as Principal Secretary), सहायक सचिव पदी अ‍ॅड. अभिजीत बगदे (Adv. Abhijeet Bagde), तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

सावानाच्या नूतन कार्यकारी मंडळाची पहिली सभा काल वस्तुसंग्रहालयात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेस उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे उपस्थित होते. या सभेपूर्वी सन 2017-2022 व सन 2022-2027 या दोन्ही कार्यकारी मंडळाची एकत्रित सभा अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या सभेनंतर नवीन पदाधिकारी निवडीच्या सभेस सुरुवात झाली. कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहायक सचिवपदी अ‍ॅड. अभिजीत बगदे, अर्थसचिवपदी देवदत्त जोशी, ग्रंथसचिवपदी जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक कार्य सचिवपदी संजय करंजकर, नाट्यगृह सचिवपदी सुरेश गायधनी व वस्तुसंग्रहालयपदी प्रेरणा बेळे यांची टाळ्यांच्या गजरात निवड करण्यात आली.

या सभेस उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, नूतन कार्यकारी मंडळ सदस्य उदयकुमार मुंगी, गणेश बर्वे, मंगेश मालपाठक, प्रा.सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे, अ‍ॅड. भानुदास शौचे उपस्थित होते.

तहकुबीची सूचना फेटाळली

पहिल्या सभेच्या प्रारंभी कार्यकारी मंडळ सदस्य श्रीकांत बेणी यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. मतदानातील आकडेवारीच्या घोळामुळे जनमानसामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी संशय आहे. तो दूर करण्यासाठी फेरमतमोजणी हाच एकमेव उपाय असल्याने पदाधिकारी निवडीची सभा तहकूब करण्याची सूचना बेणी यांनी मांडली. या सूचनेस धर्माजी बोडके, सुरेश गायधनी यांनी विरोध नोंदविला. सभाध्यक्ष प्रा. फडके यांनी तहकुबीची सूचना फेटाळल्याचे जाहीर केले. हा निर्णय अमान्य असल्याचे सांगून श्रीकांत बेणी यांनी सभात्याग केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या