Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशभारतात परतण्यासाठी ‘पबजी’ चा चीनला बायबाय

भारतात परतण्यासाठी ‘पबजी’ चा चीनला बायबाय

नवी दिल्ली | New Delhi –

केंद्रसरकारने बंदी आणल्यानंतर हादरलेल्या पबजी अ‍ॅपने भारतात पुन्हा प्रवेश करण्यासाठी नवी खेळी स्वीकारली आहे. चीनसोबतचे सर्व संबंध तोडून,

- Advertisement -

स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत.

मूळची दक्षिण कोरियन असलेली पबजी ही चीनमधील टेन्सेंट गेम्स या कंपनीची संलग्न कंपनी आहे. मात्र, लडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने चीनच्या सुमारे दोनशे अ‍ॅप्सवर आतापर्यंत बंदी घातली आहे. यात पबजीचाही समावेश आहे.

चीनमुळे आम्हाला काही दिवसांतच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आम्हाला भारताची बाजारपेठ महत्त्वाची आहे आणि त्यासाठी चीनसोबतचे सर्व संबंध आम्ही आता संपुष्टात आणणार आहोत. आमच्या खेळांबाबतची संपूर्ण जबाबदारी यापुढे आम्हीच स्वीकारणार आहोत, असे या कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आम्ही लवकरच नव्या स्वरूपातील खेळ सादर करणार आहोत आणि हे सर्व खेळ पूर्णपणे भारतीय असतील. आतापर्यंत जे खेळ यातून सादर केले जात होते, त्यांचा अंशही यात नसेल. आपल्या चाहत्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहे, असेही यात नमूद आहे.

चीन तणावाच्या अनुषंगाने भारत सरकारने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आपल्या सार्वभौमत्वाचे आणि नागरिकांच्या सुरक्षेचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे. चिनी अ‍ॅप्समुळे धोका असल्याचे लक्षात आल्याने, सरकारने त्यावर बंदीचा निर्णय घेतला, यात काहीच शंका नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या