Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशतीन महिन्यांत बँकांची 20 हजार कोटींची फसवणूक

तीन महिन्यांत बँकांची 20 हजार कोटींची फसवणूक

नवी दिल्ली –

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तब्बल

- Advertisement -

19 हजार 964 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार राईट टू इन्फॉर्मेशन अर्थात आरटीआयद्वारे उघडकीस आला आहे. बँकांच्या फसवणुकीचे 2 हजार 867 प्रकार या काळात उघडकीस आले आहेत.

आरटीआय कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती. फसवणुकीचे सर्वात जास्त प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत घडले असून रकमेचा विचार केला तर बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक फसवणूक करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी स्टेट बँकेत फसवणुकीचे 2 हजार 50 प्रकार घडले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम 2326 कोटी रुपये इतकी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये फसवणुकीचे 47 प्रकार घडले, पण एकूण फसवणूक केलेला आकडा 5125 कोटी रुपये इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या