Tuesday, April 23, 2024
Homeधुळेबालविवाह केल्यास पालकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर शिक्षेची तरतुद

बालविवाह केल्यास पालकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर शिक्षेची तरतुद

सौंदाणे Soundane । वार्ताहर

बालविवाह (Child marriage) करणे कायद्याने गुन्हा (crime under the law) आहे. असे केल्यास मुला-मुलीच्या आई-वडीलांसह (with parents) मध्यस्थी करणार्‍यांवरही गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात दोन वर्ष शिक्षा आणि एक लाख रूपये दंडाची (punishment) तरतुद आहे. त्यामुळे कुठे बालविवाह होत असल्यास पोलिसांकडे (police) अथवा बाल कल्याण समितीकडे (Child Welfare Committee) तक्रार करावी, असे आवाहन मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण कोते यांनी केले.

- Advertisement -

लळींग (ता. धुळे) येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात मिशन झिरो ड्रॉप ऑऊट व बालविवाह प्रतिबंध उद्बोधन पालक मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमशेरखान पठाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि भुषण कोते, पोऊनि हेमंत राऊत, मार्गदर्शन व्ही.एन.पेटकर, के.व्ही.खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी सपोनि कोते, पोऊनि राऊत यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा व पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

तर शाळेचे मुख्याध्याक व्ही.एन.पेटकर यांनी एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहता कामा नये, असे सांगत मिशन झिरो ड्रॉप आऊटबद्दल माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्याबाबत आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.एस.वाघ यांनी केले. तर आभार ए.सी.कछवा यांनी मानले. कार्यकमाला पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या