Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशनोकरदारांना मोठा झटका! PF व्याजदराबाबत EPFO ने घेतला मोठा निर्णय

नोकरदारांना मोठा झटका! PF व्याजदराबाबत EPFO ने घेतला मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

केंद्र सरकारने (Central Government) नोकरदारांना मोठा झटका दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरांची (EFP Interest Rates) घोषणा करण्यात आली आहे. ईपीएफओ (EPFO) ने व्याजदारात कपात करुन तमान नोकरदारांना मोठा झटका दिला आहे. तब्बल ६ कोटी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे, जो 2020-21 मध्ये 8.5 टक्के चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. 1977-78 नंतरचा हा सर्वात कमी आहे, जेव्हा EPF व्याजदर 8 टक्के होता. सरकारच्या या निर्णयामुळे पीएफ खात्यावर व्याज घेणाऱ्या ईपीएफओ (EPFO) सदस्यांना आता कमी व्याज मिळणार आहे.

व्याजदर कमी झाल्याने याचा फटका देशातील 6 कोटी नागरिकांना बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्याजदर कमी करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली होती. या शिफारशीला ईपीएफओने मान्यता दिली होती.

पीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याजदर दिला होता. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8 टक्के व्याजदर थोडा जास्त होता. 2013-14 तसेच 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज दिले, जे 2012-13 मधील 8.5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 2011-12 मध्ये व्याजदर 8.25 टक्के होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या