Wednesday, April 24, 2024
Homeनगरवंचित शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी द्या

वंचित शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी द्या

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा जोतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांना पत्रान्वये केली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात तनपुरे यांनी म्हटले, राज्यातील शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतिबा फुले कृषी शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना शासनाने जाहीर केली. यासाठी मोठा निधीही उपलब्ध करण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे. तसेच नवीन कर्ज घेण्यासाठीही ते पात्र ठरले आहेत. ही शेतकर्‍यांसाठी मोठी पर्वणीच ठरली. परंतु राज्यातील या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची संख्याही मोठी आहे.

नगर जिल्ह्याचा विचार करता आजही जिल्ह्यातील सुमारे 10 हजार 186 शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने ज्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबतची सर्व माहिती शासनास सादर केलेली आहे, यासाठी 63 कोटी 85 लाख रुपये शासनाकडून जिल्हा बँकेत अदा होणे आवश्यक आहे. ही रक्कम शासनाकडून अदा न झाल्यामुळे शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन कर्जमाफीसाठी देय असलेली रक्कम तातडीने अदा करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश द्यावेत, असे अर्थमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात तनपुरे यांनी नमूद केलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या