Saturday, April 27, 2024
Homeजळगावरुग्णांसाठी ऑक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करा

रुग्णांसाठी ऑक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करा

चाळीसगाव । प्रतिनिधी Chalisgaon

शहरात सध्या कोरोनाची संख्या आटोक्यात आहे. परंतू तरी देखील वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे. चाळीसगाव येथील कोविड सेन्टरमध्ये कोरोनाग्रस्त हायरिक्स रुग्णावर उपचारासाठी सुविधा नसल्याने त्यांना जळगाव येथे उपाचारासाठी पाठवावे लागते. परंतू यापुढे कोरोना बाधित हायरिक्स रुग्णावर चाळीसगावात उपचार होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकार्‍यांनी येथील ट्रामा केअर सेन्टरमध्ये ऑक्सीजनची सुविधा असलेल्या 50 खाटांची सुविधा तात्काळ उपलब्ध करण्यांच्या सूचना येथील वैद्यकिय यंत्रणेला केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवार चाळीसगाव येथे भेट दिली. येथील दोन्ही कोविड केअर सेन्टर व नव्या होत असलेल्या ट्रामा केअरची धावती पाहणी केली. यावेळी खासदार उन्मेष पाटील, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, आदी उपस्थित तसेच शासकिय विश्रामगृहात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी चाळीसगाव येथील दोन्ही कोविड केअर सेन्टरमद्ये कोरोनाबाधितावरील उपचाराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ट्रमा केअर सेन्टरमध्ये तात्काळ ऑक्सीजनची सुविधा असलेल्या 50 खांटाची व्यवस्था करण्याचा सूचना वैद्यकिय यंत्रणेला केल्यात. जळगाव येथील कोविड रुग्णालयाचा भार कमी करण्यासाठी तसेच चाळीसगाव येथेच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी ह्या तातडीच्या सूचना केल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे प्रथम चाळीसगाव येथे येत असल्यामुळे शहरातील वाढते कनटेन्मेंट झोन पाहणी ते करतील अशी चाळीसगावकरांची अपेक्षा होती. परंतू त्यांनी येथील दोन्ही कोविड सेन्टर व ट्रामा केअर सेन्टरची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. वास्तवीक पाहता त्यांनी शहरातील एक तरी कनटेन्मेंट झोनची पाहणी करणे अपेक्षीत होते. यामागचे कारण म्हणजे शहरातील कनटेन्मेंट झोन फक्त नावालाच आहे.

कनटेन्मेंटची नियमावली काटेकोरपणे पाळण होत नसल्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कनटेन्मेंट झोनची सुरक्षिता फक्त बाबू लावणे म्हणजे झाले असे होत नाही. तर त्याठिकाणचे सर्व्हेशन होत आहे का? कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्याचा व्यवस्थीतरित्या शोध घेतला जात आहे का? तर काही कनटेन्मेंट झोन मधील लोक परस्पर शहरसोडून बाहेर गावी जात आहे का ? आदि बाबींचा जिल्हाधिकार्‍यांनी आढाव घेणे अपेक्षित होते. परंतू त्यांनी फक्त कोविड केअर सेन्टरची पाहणी केली, आणि चाळीसगाव वैद्यकिय कामकाजाचा बाबत समाधान व्यक्त केले.

वास्तवीक पाहता, चाळीसगावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानतंर त्यांच्या संपर्कात आलेल्याचा दुसर्‍या ते तिसर्‍या दिवशी शोध घेवून, स्वॅब घेतला जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच होम क्वारंटाईन केलेले सुध्दा शहरात खुले आमपणे फिरत आहेत. तर कोविड केअर सेन्टरमध्ये देखील अनेक सुविधा अभाव आहे. परंतू जिल्हाधिकारी येणार म्हणून व्यवस्थित सुविधा मिळत असल्याचे भासवण्यात आले. वास्तवीक कोरोना बाधित रुग्णावर येथे लवकर उपचार केले जात नसल्याचे कोरोना बाधित रुग्णांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे फक्त धावती पाहणी नव्हे, तर ग्रॉऊड लेवलवर जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घेणे गरजचे होते.

आमदारांनी घेतली भेट

आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रथम चाळीसगव येथे आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी येथील शासकिय निवासस्थानी भेट घेवून त्यांचे स्वागत केले. चाळीसगाव तालुका कोरोना पासून दूर होता, मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्णांची संख्या देखील वाढायला लागली आहे. संशयित रुग्णांच्या स्वँब अहवाल उशिरा येत असल्याने अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी स्वँबची संख्या वाढविली असून ज्यांना लक्षणे नाहीत व ज्यांना गंभीर लक्षणे आहेत अशी विभागणी करुन गंभीर रुग्णांसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

आरोग्य व शहर पोलीस यंत्रणेतील अपूर्ण मनुष्यबळ बाबत मागेच पत्रव्यवहार करून अवगत केल्याचे जिल्हाधिकारी आमदार चव्हाण यांनी लक्षात आणून दिले तसेच चाळीसगाव तालुका पुन्हा एकदा शून्य रुग्णसंख्येवर आणण्यासाठी प्रशासनाच्या सोबत असल्याच्या विश्वास जिल्हाधिकारीनी दिला.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका, एक शववाहिका, 50 बेडस ला पुरेल अशी ऑक्सिजन यंत्रणा, डिजिटल एक्सरे मशीन साठी पत्र दिलेले असून जिल्हाधिकारी यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती त्यांना केली तसेच माझ्या स्वखर्चाने जलशुद्धीकरण यंत्रणा कोविड सेंटर ला बसवित असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या